Vanita Kharat: “मी जितकी हसवते तितकंच…”; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची ‘ती’ पोस्ट चर्चेत!

Vanita Kharat: “मी जितकी हसवते तितकंच…”; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची ‘ती’ पोस्ट चर्चेत!

Vanita Kharat Post: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामुळे काही विनोदी कलाकार नेहमी चर्चेत असतात. या कार्यक्रमामध्ये काम करणाऱ्या कलाकारांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देखील मिळाली. एवढेच नव्हे तर त्यांचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे वनिता खरात. ती सतत काहींना काही कारणांनी जोरदार चर्चेत येत असते. नुकतंच वनिता खरातने तिच्या वाढदिवसाबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

वनिता खरातने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट (Instagram Post) शेअर केली आहे. यामध्ये तिने एक व्हिडीओ शेअर (Video Share) केला आहे. या व्हिडीओमध्ये वनिताने अमेरिका, कॅनडा आणि भारतात तिचा वाढदिवस कसा साजरा झाला, याबद्दल तिने छोटासा प्रयत्न करत सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)


नेमकं काय आहे पोस्टमध्ये पाहा…
या वर्षीचा माझा वाढदिवस खूप विशेष होता,कारण दीड दिवस माझा वाढदिवस साजरा झाला तोही ३ देशांमध्ये अमेरिका , कॅनडा आणि भारत… तोही माझ्या लाडक्या माणसांबरोबर! इतक्या जल्लोषात आणि उत्साहात , इतक्या वेगवेगळ्या गोष्टी बघत माझा वाढदिवस साजरा होईल असं खरंच वाटलं नव्हतं. प्रेक्षकांच्या प्रेमाची ताकद मला आज इथवर घेऊन आली, आणि माझ्या मित्रांनी या वाटेवर माझी सोबत केली. घरच्यांच्या शुभाशीर्वादाने मला मार्ग दाखवला आणि नाजूक क्षणात सुमित ने माझा हात धरला! इतके प्रचंड देश पाहताना, तिथलं सौंदर्याने भारावून जाताना आणि प्रत्येक केक कापताना, सुमित ची मात्र प्रचंड आठवण आली.

मी तिथे असताना भारतात वाढदिवस साजरा करण्याची धुरा सुमित ने सांभाळली, आणि शुभेच्छा ही माझ्या पर्यंत पोचावल्या. या वाढदिवसानिमित्त स्वतःसाठी काही गोष्टी ठरवल्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मिळणार प्रेम द्विगुणित करण्याचा प्रयत्न करेन. जितकं हसवते आहे तितकाच मीही हसत राहण्याचा प्रयत्न करेन, सोबत तुम्ही असालच ही आशा बाळगून.
ता. क. – पुढच्या वाढ दिवसाला बघुया कुठल्या देशात असेन! 🤫

Box Office Collection: मायबाप प्रेक्षकांचे प्रेम पाहून थलायवा, सनी पाजी अन् अभिषेक बच्चन भारावले!

वनिता खरातचा वाढदिवस १९ जुलै रोजी होता. तिच्या या वाढदिवसाच्या पोस्टवर हास्यजत्रेच्या अनेक कलाकार आणि तिचे चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केले आहेत. यावर प्रियदर्शनीने ‘लव्ह यू टू’ असे म्हटले आहे. तर सुमित लोंढेने ‘ओहह, लव्ह यू’ असे कमेंट केल्याचे बघायला मिळाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube