Download App

यश चोप्रा फाउंडेशनकडून मीडिया शिष्यवृत्ती! मजूरांच्या मुलांना मिळणार 5 लाखांपर्यंत आर्थिक मदत

YCF शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत, फाउंडेशन आता हिंदी चित्रपटसृष्टीतील रोजंदारी मजूरांच्या मुलांना मीडिया क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

  • Written By: Last Updated:

YCF Scholarship : यश चोप्रा फाउंडेशन (YCF) ही यश राज फिल्म्सची परोपकारी शाखा, महान दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या दूरदृष्टीला पुढे नेत गेल्या ५० वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीकडून मिळालेल्या प्रेमाची परतफेड करत आहे

मीडिया शिष्यवृत्ती कार्यक्रम

यश चोप्रा यांच्या (Yash Chopra) 92 व्या जयंतीनिमित्त गेल्या वर्षी सुरू केलेल्या YCF शिष्यवृत्ती (YCF Scholarship) कार्यक्रमांतर्गत, फाउंडेशन आता हिंदी चित्रपटसृष्टीतील रोजंदारी मजूरांच्या (Hindi film Industry Laborers) मुलांना मीडिया क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती पुरवत आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला 5 लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. ही मदत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर मास कम्युनिकेशन (Media), फिल्म मेकिंग, प्रॉडक्शनडायरेक्शन, व्हिज्युअल आर्ट्स, सिनेमॅटोग्राफी आणि अॅनिमेशन या शाखांसाठी उपलब्ध आहे.

यंदा कठोर निवड प्रक्रियेनंतर निवडलेले पाच विद्यार्थी खालीलप्रमाणे

विपुल कुमार प्रजापती बी.ए. इन फिल्म, टेलिव्हिजन अँड न्यू मीडिया प्रॉडक्शन, अथर्वा कॉलेज, मुंबई

प्रीती यादव बी.ए. इन मल्टिमीडिया अँड मास कम्युनिकेशन (BAMMC), एमव्हीएलयू कॉलेज, मुंबई

भूमिका गुप्ता बी.ए. इन मल्टिमीडिया अँड मास कम्युनिकेशन (BAMMC), सेंट पॉल्स कॉलेज फॉर वुमन

आदित्य अर्जुन यादव बी.एस्सी. इन अॅनिमेशन अँड VFX, ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, मुंबई

रघुजीत गुप्ता एम.ए. इन मास कम्युनिकेशन फिल्म, टेलिव्हिजन अँड न्यू मीडिया, देवीप्रसाद गोयंका मॅनेजमेंट कॉलेज ऑफ मीडिया स्टडीज

मीडिया आणि सिनेमा क्षेत्रात करिअर

या उपक्रमाद्वारे YCF चित्रपटसृष्टीतील लाईटमन, स्पॉट बॉय, तंत्रज्ञ, संपादक अशा अनामिक नायकांना आणि त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक स्वप्नांना आधार देऊन खरी आदरांजली वाहते.

अक्षय विधानी, सीईओ, यश राज फिल्म्स यांनी सांगितले, यश जी नेहमी कंपनीला हिंदी चित्रपटसृष्टीला परत देण्यासाठी प्रेरणा देत असत. YCF शिष्यवृत्ती कार्यक्रम हा पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक मदतमहत्वाची मेंटरशिप उपलब्ध करून देतो. ज्यामुळे ते मीडिया आणि सिनेमा क्षेत्रात करिअर घडवू शकतात. या उपक्रमामुळे आपल्या चित्रपटसृष्टीतील आणखी बरेच तरुण आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुढे येतील अशी आम्हाला खात्री आहे.

पुढील फेरीसाठी अर्ज 2026 च्या सुरुवातीला खुले केले जातील. पात्र विद्यार्थी अर्ज करून भारतीय मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राच्या भविष्यात आपले पहिले पाऊल टाकू शकतात.

follow us