National Film Awards 2023: हा क्षण शब्दात वर्णन करू शकत नाही; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सलील कुलकर्णी भावूक

  • Written By: Published:
National Film Awards 2023: हा क्षण शब्दात वर्णन करू शकत नाही; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सलील कुलकर्णी भावूक

National Film Awards 2023: 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरले आहे. सलील कुलकर्णी (saleel kulkarni) यांनी दिग्दर्शन केलेल्या संवेदनशील विषयावरील एकदा काय झालं या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट श्रेणीत पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारावर सलील कुलकर्णी याने भावूक होऊन प्रतिक्रिया नोंदविली आहे.

69th National Film Awards : सलील कुलकर्णींचा ‘एकदा काय झालं’ सिनेमा ठरला सर्वोत्कृष्ट

सलील कुलकर्णी म्हणाले, हा चित्रपट तयार करताना संवेदनशील विषयावर चित्रपट तयार करणे हे आजच्या काळात धोक्याचे आहे असे इशारे मला अनेकांनी दिले होते. इतके हळवे, नाजूक कोण पाहातो, असा अनेकांचा समज होता. मात्र एक संवेदनशील चित्रपट कुठवर पोहोचू शकतो हे या चित्रपटाने दाखवून दिल्याचे दिसून येत आहे.

कुटुंबातील प्रत्येक नाते अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. आज त्याचा राष्ट्रीय पुरस्काराने होत असलेला सन्मान मला शब्दांत वर्णन करता येत नाहीये. मी कविता लिहिल्या, गाणी लिहिली, चित्रपट केला मी आजवर जे जे केलं त्याला जगभरातील रसिक प्रेक्षकांनी केवळ प्रेम दिले, यासाठी मी त्यांना कायम ऋणी राहिल, अशी भावना सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

Kavyanjali Marathi Serial : काव्याच्या मंगळागौरीसाठी सजल्या साऱ्या जणी! पाहा फोटो

निर्माते सौमेंदु कुबेर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. हा विषय हाताळताना एक जबाबदारीची भावना आमच्या मनात होती. आज जाहीर झालेला राष्ट्रीय पुरस्कार हा आम्हाला बळ देणारा आहेच, शिवाय जबाबदारी वाढवणारा देखील आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा हा विषय चर्चिला जाईल याचा आनंद आहेच.कलाकार सुमीत राघवन, उर्मिला कानेटकर, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, अर्जुन पूर्णपात्रे आणि निर्माते सलील कुलकर्णी, सौमील श्रुंगारपुरे, सिद्धार्थ महादेवन, सिद्धार्थ खिंवसरा, अनुप निमकर, अरुंधती दात्ये, पूर्वा कुबेर आणि नितीन वैद्य यांचेही मी आभार मानतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube