Download App

BB Marathi. ‘बिग बॉस मराठीच्या घरात मी माझ्या नवऱ्याला…’; काय म्हणाली योगिता चव्हाण?

Bigg Boss Marathi New Season Day 18 : योगिता चव्हाण (Yogita Chavan) 'कलर्स मराठी'वरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेत नायिका म्हणून झळकली.

Bigg Boss Marathi New Season Day 18 : योगिता चव्हाण (Yogita Chavan) ‘कलर्स मराठी’वरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत नायिका म्हणून झळकली. (Bigg Boss Marathi ) सर्वगुणसंपन्न, हवीहवीशी वाटणाऱ्या तिच्या अंतरा या भूमिकेने (Bigg Boss Marathi New Season) प्रेक्षकांची मने जिंकली. आता ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्येही तिचा चांगलाच बोलबाला आहे. सातारकर असणाऱ्या योगिताचा जन्म ठाण्यात झाला आहे. नृत्यात करिअर करण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमात ती सहभागी झाली. इंडस्ट्रीत बॅकग्राऊंड डान्सर म्हणून तिने काम सुरू केलं. पडद्यामागे काम करत सुरू झालेला तिचा प्रवास आता ‘बिग बॉस मराठी’पर्यंत पोहोचला आहे.


‘बिग बॉस मराठी’बद्दल बोलताना योगिता म्हणाली,”‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून योगिता काय आहे हे प्रेक्षकांना कळणार आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. 100 दिवस सोशल मीडिया आणि फोनपासून मी दूर असणार आहे. घरच्यांना ‘बिग बॉस मराठी’मध्ये जाण्याबाबात सांगितलं तेव्हा सर्वच खूप आनंदी होते. सासरकडची मंडळीदेखील खूप समजूतदार आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात जा आणि लढ असं त्यांनी सांगितलं आहे.

योगिता म्हणाली,”बिग बॉस मराठी’च्या घरात जाण्याआधी शेवटचा कॉल मी माझ्या बाबांना केला होता. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एखादी व्यक्ती घेऊन जाण्यास परवानगी दिली तर मी माझ्या नवऱ्याला घेऊन जाईल. माझा पती खूप मनोरंजक आहे. तो घरात माझा खूप चांगला सांभाळ करेल. यंदाच्या सीझनमध्ये एक फ्रेशनेस आहे. नावीन्य असणाऱ्या सीझनचा मी भाग आहे याचा आनंद आहे. ‘बिग बॉस मराठी’ जिंकण्याचं मी काही प्लॅनिंग केलेलं नाही. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात मला फक्त मजा करत खेळायचं आहे.

निक्कीसाठी घरातील कच्चा लिंबू कोण असेल?

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात निक्की आणि जान्हवी त्यांना वाटत असलेल्या घरातील कच्चा लिंबूबद्दल भाष्य करताना दिसत आहेत. निक्कीसाठी ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील कच्चा लिंबू रॅपर आर्या जाधव आहे. निक्कीने आर्याचं नाव घेत बिग बॉसला देखील याबद्दल सांगितलं आहे.

Bigg Boss Marathi: नवीन टास्क म्हणजे नवीन कल्ला होणार, बोटीत बसून कोण घराचा कॅप्टन बनणार?

‘या’ आठवड्यात ‘हे’ सदस्य झालेत नॉमिनेट

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्यात सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निखिल दामले आणि अभिजीत सावंत हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या चौघांपैकी या आठवड्यात कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर जाणार हे पाहावे लागेल.

follow us