मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाचे आगमन.
राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे गणपतीच्या दर्शनाला, उत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
राजकीय नेत्यांनी कुटुंबीयांसह पारंपरिक विधी करून बाप्पाचं आगमन केलं.
आकर्षक आरास, फुलांच्या तोरणांनी व दिव्यांनी घर दुमदुमलं.
नेत्यांच्या घरी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात भक्तिमय उत्सव साजरा झाला.
नेत्यांनी बाप्पाच्या आरासाचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत भक्तांना दर्शन घडवलं.
अनेक नेत्यांनी या निमित्ताने समाजातील ऐक्य अन् पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला.
गणेशोत्सवाचं दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी दिसली.