Download App

G20 Summit मधील परदेशी पाहुण्यांसोबतच्या मोदींच्या काही खास क्षणचित्रांवर नजर टाकूया…

  • Written By: Last Updated:
1 / 7

G20 परिषदेचे नवी दिल्ली येथे मोठ्या उत्साहात सुरूवात झाली असून, जगभरातील नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदर देत स्वागत केले.

2 / 7

भारताला पहिल्यांदाच या परिषदेचं यजमानपद मिळालं आहे. यासाठी जगभरातील अनेक दिग्गज नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.

3 / 7

G20 हा 20 देशांचा समूह आहे. 1999 साली या परिषदेची स्थापना झाली. जागतिक आर्थिक समस्यांवर तोडगा काढणे हा संघटनेचा उद्देश होता.

4 / 7

जागतिक आर्थिक उत्पादनात 85 टक्के आणि व्यापारात 75 टक्के पेक्षा जास्त वाटा या देशांचा आहे. या वरून अंदाज येतो की, या परिषदेचा आणि त्यातील निर्णयांचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर किती मोठा परिणाम होत असेल.

5 / 7

G20 हा 20 देशांचा समूह आहे. यामध्ये भारत, चीन, अमेरिका, रशिया, जपान, ब्रिटन, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इंडोनेशिया, दक्षिण अफ्रिका, सौदी अरेबिया, तुर्की, मेक्सिको, दक्षिण कोरिया, युरोपियन युनियन आणि अर्जेंटीना या देशांचा समावेश आहे.

6 / 7

या देशांची एक प्रणाली आहे. त्यामध्ये नवीन अध्यक्ष निवडला जातो. तो त्यावर्षी तो देश G20 बैठका पार पाडतो. तर यावर्षी भारताकडे या परिषदेचं यजमानपद आहे.

7 / 7

या देशांची दरवर्षी ही परिषद व्हायलाच हवी असंही नाही. त्यामुळे आता पर्यंत 24 वर्षांत 17 परिषदा झाल्या तर ही 18 वी परिषद दिल्लीत होत आहे.

Tags

follow us