Kalasetu सांस्कृतिक कार्यविभागाचा विशेष अभिनव उपक्रम, पाहा फोटो
shruti letsupp
Kalasetu
Kalasetu : मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत आणि शासन यांच्यात समन्वयाचा पूल बांधण्याच्या दृष्टिकोनातून सांस्कृतिक कार्यविभाग आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने गुरुवारी ‘कलासेतू’ या विशेष अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत तीन वेगवेगळे विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आले होते.
यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे उपस्थित होते.
पहिल्या परिसंवादाला ज्येष्ठ तंत्रज्ञ उज्वल निरगुडकर, वितरक समीर दिक्षित, लेखक- दिग्दर्शक अभिजीत पानसे, कामगार नेते विजय हरगुडे आदि मान्यवरांनी सहभाग घेतला. या मान्यवरांना मिडिया वनचे गणेश गारगोटे यांनी बोलतं केलं.
‘मराठी चित्रपटसृष्टीसमोरील नवी आव्हाने’ या पहिल्या परिसंवादात ‘ १५०० हुन अधिक चित्रपट तयार होतात त्यांना प्रतिनिधित्व मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे तसेच अमेरिका फिल्म मार्केटची माहिती निर्मात्यांना देणे, सबटायटल बाबत कार्यशाळा आयोजित करणे आदि वेगवेगळ्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
‘शासकीय धोरण आणि वेबपोर्टल’ या दुसऱ्या परिसंवादात ज्येष्ठ निर्माता -दिग्दर्शक महेश कोठारे, सिनेमॅटोग्राफर संजय जाधव, आशुतोष पाटील, योगेश कुलकर्णी आदि मान्यवर सहभागी झाले होते.
या सगळ्या सूचनांचा विचार करून शासन आवश्यक त्या सर्व गोष्टींचा निश्चितच पाठपुरावा करेल असे आश्वासन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.