प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज गुरुवार 3 एप्रिल 2025 ला दोन दिवसाच्या दौऱ्यासाठी थायलंडला पोहचले आहेत.
ते या ठिकाणी सहव्या बिम्सटेक शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत.
यावेळी बॅंकॉकला गेल्यावर भारतीय समुदायाने त्यांचं उत्साहात स्वागत केलं. त्यासाठी पीएम मोदी यांनी भारतीयांचं अभिवादन केलं.
त्यानंतर पीएम मोदीयांनी थाय रामायण रामकियेनचं प्रदर्शन पाहिलं. थाय रामायण पाहून ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
यावर बोलताना पीएम मोदी यांनी एक्सवर लिहिलं आहे की, भारत आणि थायलंडमध्ये एक सांस्कृतिक नातं आहे जे आमच्या माध्यमातून फुलत आहे.
पंतप्रधान मोदींचा थायलंड दौरा, भारतीय समुदायाकडून स्वगत अन् रामायण पाहून झाले भावूक…