चेन्नईचा तुषार देशपांडे झाला क्लीन बोल्ड, ‘स्कूल क्रश’ बनली लाइफ पार्टनर
letsupteam
Tushar Deshpande
चेन्नईचा मध्यमगती गोलंदाज तुषार देशपांडे विवाहबंधनात अडकला आहे. त्याने नभा गडमवारला आपली जीवनसाथी बनवले आहे.
तुषारने त्यांच्या लग्नाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने पत्नी नभासोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत.
तुषार आणि नभा शाळेच्या काळापासून एकमेकांना ओळखतात. यानंतर त्यांनी कॉलेजमध्येही एकत्र शिक्षण घेतले. आता हे दोघेही लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत.
तुषारने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. 21 डिसेंबरला दोघांचे लग्न झाले. यापूर्वी 12 जून रोजी एंगेजमेंट झाली होती. ती तुषारची स्कूल क्रश होती. त्यानंतर अनेक वर्षांनी दोघांनी लग्न केले आहे.
तुषार देशपांडे हा चेन्नईचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. त्याने अनेक वेळा उत्कृष्ट प्रदर्शन करत संघाला संकटातून सावरले आहे. त्याचा देशांतर्गत सामन्यांमध्येही चांगला रेकॉर्ड आहे.
तुषारने 30 प्रथम श्रेणी सामन्यात 81 विकेट घेतल्या आहेत. त्याने 40 लिस्ट ए सामन्यात 51 विकेट घेतल्या आहेत. यासह त्याने आतापर्यंत खेळलेल्या 67 टी-20 सामन्यांमध्ये 99 विकेट घेतल्या आहेत.