भारतीय क्रिकेटचा ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हणजे सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. ही चर्चा त्याच्या खेळाची नाही तर वैयक्तिक आयुष्याबद्दल आहे.
कारण 13 ऑगस्टला अर्जुनचा एका खाजगी समारंभात साखरपुडा उरकला आहे. सोशल मिडीयावर या लग्नाबाबत पोस्ट शेअर केल्या आहेत.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना कधीही चर्चा न झालेल्या नात्यातील अर्जुनची होणार ही पत्नी आणि मास्टर ब्लास्टरची सुनबाई नेमकी कोण आहे. तर जाणून घेऊ…
अर्जुनची पत्नी सानिया चांडोक ही मुंबईतील प्रतिष्ठित घई कुटुंबातील असून, त्यांचा व्यवसाय हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्न उद्योगात पसरलेला आहे.
त्यांच्या कुटुंबाकडे इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि लोकप्रिय ब्रुकलिन क्रीमरी (कमी कॅलरी आइस्क्रीम ब्रँड) यासारख्या व्यवसायांची मालकी आहे.
सानिया चांडोकने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे. ती देशातील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे.
तर दुसरीकडे अर्जुन तेंडुलकर सध्या 25 वर्षांचा असून भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. असं असताना त्याचा साखरपुडा उरकल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.