इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये प्रवाशांच्या बसवर दहशतवाद्यांनी (Terror Attack) भीषण हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. प्रवाशांना बसमधून खाली उतरवत त्यांना नाव, गाव विचारून या गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या हल्ल्यात 23 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यची जबाबदारी या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं घेतली आहे. याआधी एप्रिलमध्ये नोश्कीजवळ नऊ प्रवाशांना बसमधून उतरवून त्यांची ओळखपत्रे तपासल्यानंतर गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. (Gunmen kill 23 bus passengers in southwest Pakistan)
Gunmen kill 23 bus passengers in southwest Pakistan: Media report
— Press Trust of India (@PTI_News) August 26, 2024
प्रकाशित वृत्तांनुसार पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये (Balochistan) आज (दि.26) सकाळी एका प्रवासी बसवर दहशतवादी हल्ला करण्यात आला यात 23 जण ठार झाले. बलुचिस्तानच्या मुसाखेल जिल्ह्यात ही घटना घडली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी प्रवाशांना बसमधून खाली उतरण्यास भाग पाडले आणि त्यांची ओळख तपासल्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. सहाय्यक आयुक्त मुसाखाइल नजीब काकर यांचा हवाला देत डॉनने याबाबत वृत्त दिले आहे.
At least 23 people from Punjab have been killed in Balochistan’s Musakhel district after BLA terrorists offloaded passengers from trucks and buses and shot at them after checking their identities : Security forces
Operation against terrorist still continues in #Balochistan. pic.twitter.com/PAaOCkoWNR
— Malik Ali Raza (@MalikAliiRaza) August 26, 2024
साध्या वेशात प्रवास करणाऱ्या लष्करी अधिकारी अन् सैनिकांना केलं लक्ष्य
मात्र, आमच्या लोकांनी फक्त साध्या वेशात प्रवास करणाऱ्या लष्करी अधिकारी व सैनिकांना लक्ष्य केलं आहे, असा दावा त्यांनी केला आहेत. त्यांना गोळ्या घालण्याआधी त्यांची ओळख पटवण्यात आली होती, असंही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावला असून मृत्यू पावलेले लोक निरपराध नागरिक होते, असं ते म्हणाले आहेत.
Terrorists stopped a passenger bus and killed 23 people in the firing incident that occurred in Rarasham of Musakhail area of Balochistan. The Superintendent of Police said that terrorists stopped the vehicles and off-loaded the passengers, killed them on the spot and later…
— ANI (@ANI) August 26, 2024
या भीषण घटनेत ठार झालेले सर्वजण पंजाबमधील असल्याचे सांगितले जात आहे. प्रवाशांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी 10 वाहनांनाही आग लावली. या घटनेवर बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी मृत कुटुंबियांबद्दल सहानुभूती आणि शोक व्यक्त केला आहे. “मुसाखैलजवळ निरपराध प्रवाशांना लक्ष्य करून दहशतवाद्यांनी क्रूरता दाखवली असल्याचे पाकिस्तानचे मंत्री अताउल्ला तरार यांनी म्हटले आहे.
Jammu Kashmir Election : भाजपची 44 जणांची यादी रिवाईज; आता ‘स्पेशल-15’ उमेदवार मैदानात
यापूर्वी एप्रिलमध्येही नोश्कीजवळ नऊ प्रवाशांना बसमधून उतरवून त्यांची ओळखपत्रे तपासल्यानंतर गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. तर, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पंजाबमधील बलुचिस्तानमधील केच जिल्ह्यातील ६ मजुरांची हत्या करण्यात आली होती. 2015 मध्येही सशस्त्र हल्लेखोरांनी 20 मजुरांची हत्या केली होते. हे लोक पंजाबचे रहिवासी होते.