जम्मू काश्मीरच्या उधमपुरात दहशतवादी हल्ला; चकमकीत CRPF चे निरीक्षक शहीद

जम्मू काश्मीरच्या उधमपुरात दहशतवादी हल्ला; चकमकीत CRPF चे निरीक्षक शहीद

Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी (Jammu Kashmir) हल्ल्यांच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. अतिरेक्यांनी आता जम्मू भागाला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. या राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यातच आता दहशतवादी हल्ल्यांच्या वाढत्या घटनांनी सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उधमपूर जिल्ह्यात (Udhampur) अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे निरीक्षक कुलदीप शहीद झाले आहेत. बऱ्याच दिवसांपासून उधमपूर शांत होते. मात्र आता पुन्हा हा भाग धुमसू लागला आहे.

Terrorist Attack: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये चकमक; गोळीबारामध्ये एक दहशतवादी ठार

उधमपूरमधील चील आणि दुडू भागात जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकाकडून गस्त घातली जात आहे. या दरम्यानच अतिरेक्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. प्रत्युत्तर म्हणून मग जवान आणि पोलिसांनीही गोळीबारास सुरुवात केली. या चकमकीत सीरआरपीएफचे निरीक्षक कुलदीप सिंग यांना गोळी लागली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या भागात अजूनही चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची माहिती देताना जम्मू काश्मीर पोलिसांनी एक ट्विट केले आहे. सीआरपीएफचे जवान दुडू भागात गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर जवानांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. मात्र या चकमकीत सीआरपीएफ दलातील अधिकाऱ्याला वीरमरण आले अशी माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी या ट्विटमध्ये दिली आहे. यानंतरही या भागात चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

या चकमकीनंतर अतिरेकी येथून पळाले आहेत. मात्र त्यांना शोधून काढण्यासाठी येथे व्यापक स्वरुपात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत हे अतिरेकी शोधून काढून त्यांचा खात्मा करण्याचा सीआरपीएफ आणि पोलिसांचा निर्धार आहे. राज्यात पुन्हा अशांतता निर्माण करून जनजीवन विस्कळीत करण्याचा या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांचा डाव आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी आता सुरक्षा दलाकडून मोहिमा राबवण्यात येत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube