आता मिळणार तीन दिवस सुट्टी; कंपन्यांमध्ये चार दिवसांच्या आठवड्याचा प्रयोग, 1 फेब्रुवारीपासून सुरुवात
4 Day Work Week : आठवड्यातून फक्त चार दिवस काम (4 Day Work Week) आणि तीन दिवस सुट्टी. अशा प्रकारच्या वेळापत्रकाचा हळूहळू ट्रेंड वाढत आहे. अनेक देशांमध्ये कंपन्यांकडून हा ट्रेंड फॉलो केला जात आहे. यामध्ये नुकतचं जर्मनी (Germany ) या देशात देखील अनेक कंपन्यांनी चार दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे. अनेक देशांतील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा आठवडा केला आहे.
पाकिस्तानात घमासान! ‘बलूच आर्मी’चा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला; 10 ठार, 2 शहरांवर कब्जा
जर्मनीमध्ये अनेक कंपन्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना चार दिवसांचा आठवडा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता या कंपन्यांचे कर्मचारी आठवड्यात केवळ चारच दिवस काम आणि तीन दिवस सुट्टीवर असणार आहेत. विशेष म्हणजे या सुट्टीच्या दिवसांचे देखील वेतन त्यांना मिळणार आहे. त्यांचं कोणतेही वेतन सुट्टी दिल्यामुळे कापले जाणार नाहीये. यामध्ये तब्बल 45 कंपन्यांनी ही योजना आणली आहे. या अगोदर ब्रिटनमध्ये अनेक कंपन्यांनी हा प्रयोग केला आहे.
मुख्यमंत्रीच हरवले आहेत! 24 तासांपासून हेमंत सोरेन नॉट रिचेबल, स्टाफचे फोनही बंद
दरम्यान सध्या जर्मनीमध्ये आर्थिक संकट निर्माण झालेलं आहे. त्यात युरोपच्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्था देखील गेल्या वर्षी मंदीच्या छायेत होत्या. त्यामुळे आर्थिक प्रगती करण्यासाठी जर्मनीमध्ये संघर्ष सुरू आहे. अनेक कंपन्यांना देखील काम करणारे कर्मचारी कमी असल्याने फटका बसत आहे. त्यामुळेच अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा आठवडा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण यामुळे कर्मचाऱ्यांची उत्पादन क्षमता वाढून कर्मचारी कमतरतेचं संकट ही दूर होईल.
करण गेल्या अनेक दिवसांपासून अनेक कर्मचारी संघटना आणि कर्मचारी हक्क संघटना कामगारांवर किंवा कर्मचाऱ्यांवरती कंपन्यांकडून दबाव टाकला जात असल्याची आरोप करत आहेत. तर एक फेब्रुवारीपासून जर्मनीतील अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा आठवडा सुरू करत आहेत.