Download App

Kuwait Fire : कुवैतमध्ये इमारतीला भीषण आग; 40 भारतीय कामगारांचा होरपळून मृत्यू, 30 जखमी

दक्षिण कुवेतमधील मंगफ येथील स्थलांतरित कामगारांच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 5 भारतीयांसह 41 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. 

  • Written By: Last Updated:

40 Indians Killed In Fire At Kuwait Building Housing Workers, 30 Injured : दक्षिण कुवेतमधील मंगफ येथील स्थलांतरित कामगारांच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 40 भारतीय कामगांराचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, 30 जण जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेले भारतीय नागरिक केरळ येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बुधवारी (दि.12) स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 च्या सुमारास लागली. कुवेतच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून जखमींना योग्य उपचार देण्यासाठी वैद्यकीय पथके सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना

या भीषण आगीच्या घटनेनंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दुःख व्यक्त केले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांबद्दल सहवेदना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर आणि पूर्ण बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. कुवैतमधील भारतीय दुतावास या घटनेवर लक्ष ठेवून असून, सर्वांना सर्वतोपरी मदत करेल असे जयशकंर यांनी सांगितले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुवैतमधील मंगफ येथे एक स्थलांतरीत कामगारांची इमारत आहे. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास लेबर कॅम्पच्या स्वयंपाकघरात आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच काही कामगारांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उड्या मारल्या. यात अनेकांचा मृत्यू झाला. तर, अनेकांना वेळेत बाहेर न पडता आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. या इमारतीत सुमारे 195 मजूर राहत असल्याचे सांगितले जात आहे. ज्या इमारतीला आग लागली ती इमारत मल्याळी व्यापारी केजी अब्राहम यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले जात आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, इमारतीत आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भारतीय दुतावासाने जारी केले हेल्पलाईन नंबर्स

कुवैतमधील मंगफ येथील इमारतीला लागलेल्या भीषण आगीत  40 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारतीय दूतावासाने हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. या आगीत अडलेल्या आणि मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांबाबत माहिती मिळवण्यासाठी संबंधित कागारांच्या कुटुंबियांनी +965-65505246 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन भारतीय दूतावासाकडून करण्यात आले आहे.

इमारतीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश

या भीषण अपघातानंतर कुवैतचे गृहमंत्री शेख फहद अल-युसेफ अल-सबाह यांनी पोलिसांना इमारतीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. कुवेतचे उपपंतप्रधान फहाद युसूफ अल सबाह यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाचे आदेश दिले आहेत. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.

follow us