Download App

New York Earthquake : तैवाननंतर न्यूयॉर्क, न्यू जर्सीमध्ये 5.5 तीव्रतेचा भूकंप, नागरिक घाबरून रस्त्यावर

  • Written By: Last Updated:

New York Earthquake : तैवान आणि जपाननंतर अमेरिकेत शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले. युरोपीयन भूमध्यसागरीय भूकंप विज्ञान केंद्राच्या म्हणण्यानुसार, न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमध्ये (New York Earthquake ) झालेल्या भूंकपाचे केंद्र पृथ्वीच्या खाली 10 किमी (6.21 मैल) होते. न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी शहरातील भूकंपाची तीव्रता 5.5 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपामुळे इमारती हादरल्या होत्या. दरम्यान, जीवित किंवा मालमत्तेच्या हानीबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

तुम्ही काँग्रेस पक्ष कुठे नेऊन गहाण टाकला…; महसूलमंत्री विखेंचे थोरातांवर टीकास्त्र 

यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने नोंदवले आहे की शुक्रवारी ईशान्य न्यूयॉर्कच्या अनेक भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सुरुवातीला त्याची तीव्रता 4.7 मोजली गेली आहे. भूकंपामुळे न्यूयॉर्कमधील अनेक इमारती हादरायला लागल्या. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात लोक घराबाहेर पडले. तर आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सनेही शुक्रवारी सकाळी न्यूयॉर्कमध्ये 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहीती दिली. युरोपियन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने सुरुवातीला 5.5 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता 5.5 मोजली होती.

पुन्हा राजकीय भूकंप! धैर्यशील मोहिते आणि रामराजे निंबाळकर ‘तुतारी’ फुंकणार? 

न्यू यॉर्क, न्यू जर्सी, उत्तर पेनसिल्व्हेनिया आणि पश्चिम कनेक्टिकटसह संपूर्ण प्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवले, असे रॉयटर्सच्या पत्रकाराने सांगिलते. न्यूयॉर्कच्या ब्रॉन्क्स बरोमध्ये राहणाऱ्या 38 वर्षीय चरिता वॉलकॉट यांनी सांगितले की, भूकंपाचे धक्के सुमारे 30 सेकंदांपर्यंत जाणवले.

USGS ने सांगितले की भूकंपाचा केंद्रबिंदू लेबनॉन, एनजे ते मॅनहॅटनच्या पश्चिमेला ५० मैल होते. वृत्तानुसार, फिलाडेल्फिया ते बोस्टनपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले.

पूर्वेकडील अनेक विमानतळांवरील उड्डाणे तात्काळ स्थगित करण्यात आली. न्यूयॉर्कमध्ये कोणतेही नुकसान झाले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

हिमाचल प्रदेशातही भूकंपाचे धक्के
तर भारतातील हिमाचल प्रदेशातही गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री ९.३४ वाजता हे धक्के बसले. भूकंपाची तीव्रता 5.3 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किलोमीटर खोलीवर होता. या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.

follow us