Download App

900 तासांचे रिसर्च अन् 150 हून अधिक प्रयोग…, 9 महिने सुनीता विल्यम्सने अंतराळात काय केले?

Sunita Williams Return : तब्बल नऊ महिन्यानंतर आज आंतरळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विल्मोर (Butch Wilmore) हे पृथ्वीवर

  • Written By: Last Updated:

Sunita Williams Return : तब्बल नऊ महिन्यानंतर आज अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विल्मोर (Butch Wilmore) हे पृथ्वीवर परतले आहे. दोन्ही आंतरळवीर 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station) पोहोचले होते. त्यांचा प्रवास फक्त 8 दिवसांचा होता मात्र तांत्रिक अडचणींमुळे त्यांना 9 महिने तिथेच राहावे लागले आहे. या 9 महिन्यात अंतराळात सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी 900 तासांचे रिसर्च आणि 150 हून अधिक प्रयोग केले असल्याची माहिती आता समोर आली आहे.

या मोहिमेदरम्यान त्यांनी अंतराळ स्थानकाच्या देखभाल आणि स्वच्छतेत महत्त्वाची भूमिका बजावली. फुटबॉल मैदानाच्या आकाराचे या स्थानकामध्ये त्यांनी खराब आणि जुनी उपकरणे बदण्याचा प्रयत्न केला तसेच वैज्ञानिक प्रयोग देखील केले .

9 वेळा स्पेसवॉक 

तर दुसरीकडे या मोहिमेदरम्यान सुनीता विल्यम्स यांनी 900 तासांचे संशोधन पूर्ण केले आणि 150 हून अधिक वैज्ञानिक प्रयोग करुन एक नवा विक्रम प्रस्थापित केला. याच बरोबर त्यांनी या मोहिमेदरम्यान अंतराळ स्थानकाच्या बाहेर 62 तास 9 मिनिटे घालवली म्हणजेच त्यांनी 9 वेळा स्पेसवॉक केला असल्याची माहिती नासाकडून देण्यात आली आहे.

नवीन अणुभट्ट्या विकसित केल्या

9 वेळा स्पेसवॉकसह त्यांनी या मोहिमेदरम्यान अंतराळ स्थानकावरील अनेक महत्त्वाच्या संशोधन प्रकल्पांवर काम केले असल्याची देखील माहिती नासाकडून देण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमने गुरुत्वाकर्षणाचा अंतराळातील द्रव प्रणालींवर कसा परिणाम होतो याबाबत अभ्यास केला. तसेच त्यांनी पाणी आणि इंधनसाठी नवीन अणुभट्ट्या विकसित करण्यावर रिसर्च केला.

गाझामध्ये मृत्यूचे तांडव, इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला, 413 लोकांचा मृत्यू

या दरम्यान सुनीता विल्यम्स यांनी बायोन्यूट्रिएंट्स प्रोजेक्टमध्ये भाग घेतला ज्यामध्ये शास्त्रज्ञ बॅक्टेरिया वापरून पोषक तत्वे तयार करण्याचे मार्ग कोणते यावर अभ्यास करण्यात आले. या नवीन प्रोजेक्टमुळे अंतराळवीरांना ताजे पोषक तत्वे मिळण्यास मदत होऊ शकते असा दावा नासाकडून करण्यात आला आहे.

follow us