गाझामध्ये मृत्यूचे तांडव, इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला, 413 लोकांचा मृत्यू

Israel Attack On Gaza : इस्त्रायलने पुन्हा एकदा गाझावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात 400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर 500 पेक्षा जास्त नागरिक या हल्ल्यात जखमी झाले आहे. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. इस्त्रायल (Israel) आणि हमासमध्ये (Hamas) जानेवारी महिन्यात दोन महिन्यांसाठी युद्ध विराम करण्यासाठी करार करण्यात आला होता मात्र इस्त्रायलकडून युद्धबंदी करार मोडण्यात आला असल्याचा आरोप हमासकडून करण्यात आला आहे.
तर या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की ही फक्त सुरुवात आहे आम्ही हमासला संपवेपर्यंत लष्करी कारवाई सुरूच ठेवणार आहे.
युद्धबंदी कराराचे उल्लंघन
तर दुसरीकडे इस्रायली सैन्याने उत्तर गाझापासून दक्षिणेकडे अनेक भागात हवाई हल्ले केले असल्याची माहिती पॅलेस्टिनी अधिकारीने दिली आहे. तर हमासने या हल्ल्यांना “विश्वासघात” म्हटले आहे आणि इस्रायलवर युद्धबंदी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. तर या हल्ल्यानंतर अनेक देशांनी इस्रायलचा निषेध केला आहे. इस्त्रायलने केलेल्या या हल्ल्यानंतर हमासकडून देखील प्रत्युत्तर पाहायला मिळू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इस्त्रायल आणि हमास दरम्यान युद्धाला सुरुवात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नवे क्षितिज गाठून, मातृभूमीकडे परत ! सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर
मदत पुरवठा थांबला
तर यापूर्वी इस्त्रायलने गाझामध्ये सुरु असणाऱ्या मदत पुरवठा थांबवला आहे. त्यामुळे या भागात राहणारे 23 लाख लोकांसाठी परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील ओलिसांच्या सुटकेबाबत आणि कायमस्वरूपी युद्धबंदीबाबतच्या चर्चा थांबलेल्या असताना इस्त्रायलकडून हल्ला करण्यात आला आहे. तर या हल्ल्यांद्वारे नेतान्याहू यांचे सरकार आपले राजकीय स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हमासकडून करण्यात आला आहे.