व्हायचं होतं जनावरांचं डॉक्टर पण, नशिबी होती अंतराळाची सफर; सुनीता विलियम्सचं करिअरच घडलं

व्हायचं होतं जनावरांचं डॉक्टर पण, नशिबी होती अंतराळाची सफर; सुनीता विलियम्सचं करिअरच घडलं

Sunita Williams Story : भारतीय वंशाच्या अमेरिकी अंतराळ यात्री सुनीता विलियम्स अखेर 286 दिवसांनंतर (Sunita Williams) पृथ्वीवर परतल्या आहेत. त्यांच्यासह बूच विलमोर, निक हेग आणि रुसी कॉस्मोनॉट अलेक्झेंडर गोर्बूनोव सुद्धा परतले आहेत. स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून सुनीता विलियम्स पृथ्वीवर परतल्या. भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे 3.27 वाजता अमेरिकेतली फ्लोरिडाच्या समुद्रात स्पेसक्राफ्ट उतरले. यानंतर आता जगभरात सुनीता विलियम्स यांची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही त्यांच्याच नावाची चर्चा आहे. सुनीता विलियम्स कोण आहेत? त्यांना कोणत्या क्षेत्रात भवितव्य घडवायचं होतं याची खास माहिती तुमच्यासाठी..

सुनीता विलियम्स यांच्या वडिलांचं नाव दीपक पंड्या आहे. गुजरातमधील मेहसाणा गावाचे रहिवासी दीपक पंड्या यांनी अहमदाबाद येथून डॉक्टरकीचे शिक्षण घेतले होते. यानंतर त्यांनी थेट अमेरिका गाठली. येथेच त्यांनी स्लोवेनियाई वंशाच्या महिलेशी लग्न केले. यानंतर या दाम्पत्या पोटी सुनीता यांचा जन्म झाला. लहानपणी सुनीता यांना प्राण्यांबाबत ओढा होता. याच कारणामुळे आपण जनावरांचे डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. पशुवैद्यक अभ्यासक्रमासाठी त्यांनी अर्जही केला होता. पण आवडीचे कॉलेज त्यांना मिळाले नाही.

सुनीता विलियम्स यांचे पती कोण? दोघांची लव स्टोरी अन् विवाहबंधन; किस्साही खास..

यानंतर सन 1983 मध्ये त्यांनी थेट अमेरिके नौदल जॉइन केले. 1987 मध्ये भौतिक विज्ञानाची पदवी घेतली. ही पदवीच सुनीता विलियम्स यांच्या यशाची पहिली पायरी ठरली. नौदलातील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या एक पायलट झाल्या आणि अनेक प्रकारची विमाने उडवली. याच दरम्यान त्यांना जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये जाण्याची संधी मिळाली. या प्रसंगाने सुनीता यांच्या करिअरला वेगळीच कलाटणी मिळाली. या ठिकाणी त्यांची भेट अंतराळ यात्री जॉन यंग यांच्याशी झाली. जॉन यंग चंद्रावर जाणारे नववे व्यक्ती होते. सुनीता खूप प्रभावित झाल्या यानंतरच त्यांनी एक एस्ट्रोनॉट बनण्याचा निर्णय घेतला.

नासाने केले होते रिजेक्ट

मिडिया रिपोर्ट्सनुसार जॉन यंग यांच्या भेटीनंतर सुनीता विलियम्स यांनी अंतराळ यात्री होण्यासाठी नासात अर्ज केला होता. परंतु, त्यांचा अर्ज नाकारला होता. यानंतर सन 1995 मध्ये त्यांनी फ्लोरिडा इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून इंजिनिअरींगची मास्टर डिग्री घेतली. यानंतर पुन्हा नासात अर्ज केला. यावेळी मात्र नासाने त्यांची निवड केली. पण अंतराळात जाण्यासाठी सुनीता विलियम्स यांना बराच काळ वाट पहावी लागली. आठ वर्षांनंतर म्हणजेच 2006 मध्ये त्यांना अंतराळात जाण्याची संधी मिळाली.

900 तासांचे रिसर्च अन् 150 हून अधिक प्रयोग, 9 महिने सुनीता विल्यम्सने अंतराळात काय केले?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube