Albanese showered praise on PM Modi : पंतप्रधान मोदींसाठी ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी 20 हजार भारतीयांनी हजेरी लावली. तसेच यावेळी ऑस्ट्रेलियाच्या अर्ध्या मंत्रिमंडळाची उपस्थित होते. यावेळी मोदींच्या नावाच्या घोषणाबाजीने सभागृह दुमदुमून गेले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज देखील उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचे त्यांचं स्वागत केल्याबद्दल आभार मानले. त्याचबरोबर त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅंथनी अल्बनीज यांचं भरभरून कौतुकही केलं. दरम्यान या अगोदर अल्बनीज यांनी देखील मोदींचं कौतुक केलं. ते म्हणाले मी गेल्या वेळी याच मंचावर अमेरिकन गायक ब्रूस स्प्रिंगस्टीन याला पाहिलं होतं. मात्र लोकांनी त्याला एवढा प्रतिसाद दिला नव्हता जेवढा पंतप्रधान मोदींना दिला आहे. पंतप्रधान मोदी बॉस आहेत.
फुलाला मिळालं मोदींचं नाव, अचानक गाठलं पाकिस्तान; मोदींच्या ‘त्या’ दौऱ्यांचा झाला सुपर इव्हेंट!
दुसरीकडे मोदींनी देखील अल्बनीज यांच कौतुक केलं. त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, मी जेव्हा 2014 ला ऑस्ट्रेलियात आले होतो तेव्हा मी तुम्हाला वचन दिले होते की, येथील भारतीयांनी पुन्हा भारताच्या पंतप्रधानांची २८ वाट पाहावी लागणार नाही. त्यानुसार मी पुन्हा आले आहे. मात्र यावेळी मी एकटा आलो नाही तर माझ्यासोबत पंतप्रधान अल्बनीज देखील आले आहेत.
यावेळी भाषणात पंतप्रधान मोदी म्हणााले, भारत-ऑस्ट्रेलियाचे संबंध स्पष्ट करायाचे झाल्यास तीन ‘सी’ बद्दल सांगावे लागेल. ज्यामध्ये कॉमनवेल्थ, क्रिकेट आणि करी त्यानंतर भारत-ऑस्ट्रेलियाचे संबंध तीन डी वर आधारित आहेत. डेमोक्रसी, डायसव्होरा आणि दोस्ती. तर काही लोकांनी भारत-ऑस्ट्रेलियाचे संबंध तीन ई वर आधारित असल्याचं म्हटलं आहे. एनर्जी, इकॉनॉमी, एज्युकेशन. मात्र यापेक्षा देखील भारत-ऑस्ट्रेलियाचे संबंध मोठे आहेत. असंही मोदी म्हणाले. त्यांच्या या भषणावेळी ऑस्ट्रेलियन नागरिकांनी टाळ्यांनी दाद दिली.