America attacks on Houthi : रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरुच (Russia Ukraine War) आहे. युद्ध सुरू असतानाच इस्त्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यातही युद्धाचा भडका उडाला. तर दुसरीकडे लाल समुद्रात हूथी बंडखोरांनी (Houthi Rebels) जहाजांवर हल्ले करत उच्छाद मांडला. या हल्ल्यांमुळे तिसऱ्या महायुद्धाची चर्चा जोर धरू लागलेली असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिका आणि ब्रिटनने हूथी बंडखोरांचा (America attacks on Houthi Rebels) बिमोड करण्याची मोहिम हाती घेतली असून इराण समर्थक या बंडखोरांवर हल्ले सुरू केले आहेत.
Houthi Attacks : हुती बंडखोरांची घटका भरली; अमेरिकेचा अखेरचा इशारा, सैन्यही अलर्ट
क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांच्या मदतीने दोन्ही देशांच्या सैन्याने हल्ले केले. बॉम्बस्फोटही केले. या हल्ल्यांत बंडखोरांची अनेक ठिकाणे नष्ट झाली. या हल्ल्यांमुळे बंडखोरांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे या हवाई हल्ल्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. बंडखोरांनी लाल समुद्रातून अमेरिकन ठिकाणांनी लक्ष्य केले. इराण आणि इराकमधील अमेरिकेच्या दूतावासांवर हल्ले झाले आहेत. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाल समु्द्रातील जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिका आणि ब्रिटिश सैन्याने कारवाईत येमेनमधील इराण समर्थित हूथी बंडखोरांवर हल्ले सुरू केले आहेत. ऑस्ट्रेलिया, बहरीन आणि कॅनडा यांच्या मदतीने हल्ले केले जात असल्याचे बायडेन म्हणाले.
कोण आहेत हूथी बंडखोर?
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध अद्याप कायम आहे. गाझामध्ये लपलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना पकडण्यसाठी इस्त्रायलने जंगजंग पछाडले आहे. पण त्याचवेळी या युद्धामुळे हूथी बंडखोरही आक्रमक झाले आहेत. हूथी हा येमेनमधील शिया मुस्लीम समुदायाचा एक सशस्त्र अतिरेकी गट आहे. 1990 मध्ये येमेनचे तत्कालीन अध्यक्षांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी हुसैन अल हूथी यांनी या संघटनेची स्थापना केली होती. त्यांच्या नावावरुव या संघटनेला हूथी हे नाव मिळाले.
Israel Hamas War : दक्षिण गाझात इस्त्रायलचा मोठा अटॅक; 45 लोकांचा मृत्यू