PM Modi America Visit : पीएम नरेंद्र मोदी (PM Modi) अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. पोलंड, युक्रेन आणि रशियानंतर आता मोदींनी थेट अमेरिका गाठली आहे. त्यांच्या या दौऱ्याकडे जगभराचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यातून भारताला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताला मोठं यश मिळालं आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीशी (Indian Culture) संबंधित 297 अनोख्या वस्तू अमेरिकेने भारताला परत केल्या आहेत. तस्करीच्या माध्यमातून या वस्तू देशाबाहेर पोहोचल्या होत्या. किंमती वस्तूंची चोरी आणि तस्करी ही समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. 2014 नंतर भारताला जवळपास 640 मौल्यवान आणि प्राचीन वस्तू पुन्हा मिळाल्या आहेत.
राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बायडेन बाहेर का पडले? जाणून घ्या 5 मोठी कारणे
अमेरिकेने या वस्तू परत केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट लिहीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे आभार मानले आहेत. बेकायदेशीर तस्करीच्या विरोधातील लढा आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत होत आहेत. 297 मौल्यवान कलाकृती पुन्हा भारताला दिल्याबद्दल आम्ही अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) आणि अमेरिका सराकारचे आभारी आहोत.
याआधीही मोदींच्या अमेरिका दौऱ्यावेळी अमेरिकेने अनेक प्राचीन वस्तू भारताला परत केल्या होत्या. 2021 मध्ये ज्यावेळी मोदी अमेरिकेला गेले होते त्यावेळीही अमेरिकेने 157 वस्तू भारताला परत केल्या होत्या. यामध्ये बाराव्या शतकातील नटराजाची मूर्तीही होती. 2023 मधील अमेरिका दौऱ्यावेळ अमेरिकेने भारताला 105 वस्तू परत दिल्या होत्या. अशा प्रकारे एकट्या अमेरिकेकडूनच आतापर्यंत भारताला 578 प्राचीन आणि अतिशय मौल्यवान वस्तू भारताला परत मिळाल्या आहेत.
बांग्लादेशातील कोणतं बेट मागत होता अमेरिका? नकार देताच शेख हसीनांचं सरकारच गेलं
अमेरिके व्यतिरिक्त युकेकडून 16 आणि ऑस्ट्रेलियाकडून 14 कलाकृती परत मिळाल्या आहेत. 2004 ते 2013 या काळात फक्त एकच कलाकृती परत मिळवण्यात भारताला यश मिळालं होतं. जुलै 2024 मध्ये 46 व्या वर्ल्ड हेरिटेज कमिटी व्यतिरिक्त नवी दिल्लीत अमेरिका आणि भारत यांच्यात कल्चरल प्रॉपर्टी अॅग्रीमेंटवर सह्या झाल्या होत्या. या करारानुसार सांस्कृतिक वस्तूंच्या बेकायदेशीर तस्करीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जातील.
मागील दहा वर्षांच्या काळात भारत सरकारने विविध मौल्यवान वस्तू पुन्हा मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. त्याचे सकारात्मक परिणामही दिसले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जागतिक नेत्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधांमुळेच या वस्तू भारताला परत मिळाल्या आहेत. तस्करीच्या माध्यमातून विदेशात गेलेल्या वस्तू आणि मूर्ती या भारताच्या प्राचीन संस्कृतीशी संबंधित आहेत.