युक्रेन अन् इस्त्रायल युद्धाला बायडनच जबाबदार; एलन मस्कच्या मुलाखतीत भडकले ट्रम्प…
Donald Trump Interview : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीआधी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि एलन मस्क (Elon Musk) दोघेही एकत्र दिसून आले. निमित्त होते एलन मस्कने घेतलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाखतीचे. तांत्रिक अडचणींमुळे मुलाखत (Presidential Election) प्रसारीत होण्यास वेळ लागला खरा पण आता जगभरात याच मुलाखतीची चर्चा सुरू झाली आहे. मुलाखती दरम्यान ट्रम्प यांनी अमेरिकेची सध्याची परिस्थिती, सध्याच्या जगाची अवस्था, राष्ट्रपती निवडणूक, गोळीबाराच्या घटना अशा विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली. इतकेच नाही तर त्यांनी उत्तर कोरियाचा (North Korea) सनकी हुकूनशहा किम जोंग उन याचाही उल्लेख मुलाखतीत केला.
पुतिन-जिनिपंग भेटीवर ट्रम्पनामा
सध्याच्या खेळात मी आघाडीवर आहे. त्यांचा इशारा अमेरिकेतील निवडणुकीकडे होता. मी माझ्या देशावर प्रेम करतो. इतकेच नाही तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन (Vladimir Putin) आणि माझ्यात चांगलं पटतं. आम्ही दोघे एकमेकांचा आदर करतो. मी पुतिन यांनी युक्रेनवर (Russia Ukraine War) हल्ला करू नका असे सांगितल्याचा मोठा खुलासा ट्रम्प यांनी या मुलाखतीत केला.
Donald Trump : ठरलं तर! राष्ट्राध्यक्षपदासाठी पुन्हा ट्रम्प-बायडेन टक्कर; ‘या’ उमेदवाराची माघार
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) आणि किम जोंग यांच्याबाबतीतही (Kim Jong Un) ट्रम्प यांनी वक्तव्य केले. नेते मंडळींना काबूत ठेवण्यासाठी नेहमीच एका मजबूत राजनेत्याची आवश्यकता असते. माझे उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग ऊन यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत, असे ट्रम्प म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. किम जोंगचे अमेरिकेबाबत काय विचार आहेत हे जगजाहीर आहे. तरी देखील ट्रम्प यांचा हा मूड बदललेल्या राजकारणाचे संकेत देत आहे.
..तर इस्त्रायलवर हल्ला झालाच नसता
या मुलाखतीत ट्रम्प यांनी इस्त्रायल हमास युद्धाचा (Israel Hamas War) उल्लेख केला. युद्धाला तोंड फुटले त्यावेळी जर मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो तर इस्त्रायलवर कधीच हल्ला झाला नसता. मी राष्ट्रपती असताना मला याची पूर्ण जाणीव होती की इराण (Iran) सगळ्या बाजूंनी घेरला गेला आहे. आतंकवादाला पोसण्यासाठीही इराणकडे पैसे नव्हते, असा धक्कादायक खुलासा ट्रम्प यांनी केला.
मुलाखती दरम्यान ट्रम्प यांनी निवडणूक रॅली दरम्यान झालेल्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा उल्लेख केला. ट्रम्प म्हणाले, मला अचानक समजलं की गोळी झाडली गेली आहे. नंतर माझ्या लक्षात आलं की कानाला गोळी लागली आहे. या घटनेवरून मला इतकंच म्हणाचंय की जे लोक देवावर विश्वास करत नाहीत त्यांनी आता देवावर विश्वास ठेवण्यास सुरुवात करावी.
ठरलं! डोनाल्ड ट्रम्पच देणार जो बायडेनला टक्कर, तिसऱ्यांदा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
कमला हॅरिस अमेरिका उद्धवस्त करतील
कमला हॅरिस कॅलिफोर्नियाच्या महापौर झाल्या त्यांनी ते शहरच उद्धवस्त करून टाकलं. आता त्या जर राष्ट्राध्यक्ष झाल्या तर देश उद्धवस्त होईल. युक्रेन आणि गाझात आज जी विनाशकारी युद्ध सुरू आहेत त्याला जो बायडेन हेच खऱ्या अर्थाने जबाबदार आहेत. कमला या सीमा सुरक्षा प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी देशाच्या सीमा बंद करता आल्या नाहीत त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अमेरिकेत घुसले.