Download App

मोठी बातमी! पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला, IED स्फोटात दहा सैनिक ठार; नेमकं काय घडलं?

क्वेटा शहराजवळ मार्गट परिसरात पाकिस्तानी सैन्यावर (Pakistan Army) हल्ला करुन दहा सैनिकांना ठार मारण्यात आले.

Pakistan News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात (Pahalgam Terror Attack) तणाव वाढलेला असतानाच पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाला आहे. बलूच लिबरेशन आर्मीने दावा (BLA) केला आहे की क्वेटा शहराजवळ मार्गट परिसरात पाकिस्तानी सैन्यावर (Pakistan Army) हल्ला करुन दहा सैनिकांना ठार मारण्यात आले. बीएलएवनुसार हा हल्ला आयईडीच्या माध्यमातून केला गेला. यात पाकिस्तानी सैन्याचे वाहन पूर्ण उद्धवस्त झाले.

बीएलएने घेतली हल्ल्याची जबाबदारी

या भागात अनेक वर्षांपासून बलूच बंडखोरांचा दबदबा आहे. या हल्ल्यासंदर्भात अद्याप पाकिस्तानी आर्मीने कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही. बलूच आर्मी मागील काही वर्षांपासून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करत आहे. त्यासाठीच त्यांच्याकडून संघर्ष सुरू आहे. बलुचिस्तान आधी पाकिस्तानचा भागच नव्हता. पण पाकिस्तानी आर्मीने दडपशाही करून या प्रांतावर कब्जा केला. बलुचिस्तानच्या नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले. तेव्हापासूनच बलुचिस्तानात असंतोष धुमसत आहे. बलूच आर्मीकडून पाकिस्तानी सैन्यावर हल्ले होत आहेत. आताही ताजा हल्ला आम्हीच केला असे स्पष्ट करत या हल्ल्याची जबाबदारी बीएलएने घेतली आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्र युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाकडे किती क्षेपणास्त्रे?

बीएलएचे प्रवक्ते जियांद बलोच यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. आमचे हल्ले कब्जाधारी सैन्याविरुद्ध सुरुच राहणार आहे. पाकिस्तानी सैन्यावर रिमोट कंट्रोल आयईडीद्वारे हल्ला केला गेला. या हल्ल्याच शत्रूचे वाहन पूर्ण उद्धवस्त झाले आहे. यात दहा सैनिकांचा मृत्यू झाला.

पाकिस्तानचे तुकडे तुकडे होणार : दुबे

बलूच लिबरेशन आर्मीद्वारे पाकिस्तानी सैन्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बलुचीने पाकिस्तान सैन्याला (Pakistan Army) धडा शिकवला. पाकिस्तान आता आमच्याकडील टुकडे गँगसारखाच तुकेड तुकडे होऊन जाईल, 56 इंच असे खोचक ट्विट दुबे यांनी केले आहे.

युद्धाच्या मैदानातच नाही ‘या’ क्षेत्रातही पाकिस्तान पराभूत; शिक्षण ते विकास भारताचाच डंका!

follow us