‘संपूर्ण बांगलादेश हादरणार आहे’, उस्मान हादीची हत्या अन् प्रेयसीला सांगितलेली Inside Story

12 डिसेंबर रोजी ढाका येथे दुचाकीवर बसलेल्या मुखवटाधारी हल्लेखोरांनी उस्मान हादीवर गोळ्या झाडल्या होत्या. हा हल्ला घडवून आणण्यामागे फैजल करीम हा मुख्य आरोपी आहे.

'संपूर्ण बांगलादेश हादरणार आहे’, उस्मान हादीची हत्या अन् प्रेयसीला सांगितलेली Inside Story

'संपूर्ण बांगलादेश हादरणार आहे’, उस्मान हादीची हत्या अन् प्रेयसीला सांगितलेली Inside Story

बांग्लादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला असून, विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याच्या हत्येनंतर हा हिंसाचार उफाळून आला आहे. बांग्लादेशात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात निदर्शनं, जाळपोळ केली जात असतानाच आता यात नवी माहिती समोर आली आहे. त्यानुसार हादीची हत्या करण्यापूर्वी हल्लेखोरानं त्याच्या प्रेयसीला संपूर्ण बांग्लादेश हादरणार आसल्याची कल्पना दिल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं हत्येच्या आदल्या रात्री काय घडलं होतं. त्याचीची इनसाईड स्टोरी जाणून घेऊया…

अमेरिकेत एपस्टिन फाईल्स सार्वजनिक; बिल क्लिंटन, पॉप गायक मायकल जॅक्सन ट्रम्प यांच्यासह अनेकांचे फोटो समोर

हादीची हत्या नेमकी कशी झाली?

12 डिसेंबर रोजी ढाका येथे दुचाकीवर बसलेल्या मुखवटाधारी हल्लेखोरांनी उस्मान हादीवर गोळ्या झाडल्या होत्या. हा हल्ला घडवून आणण्यामागे फैजल करीम हा मुख्य आरोपी आहे. उस्मान हादीला गोळ्या लागल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने त्याला चांगल्या उपचारांसाठी एअर ॲम्बुलन्सने सिंगापूर येथे पाठवले. परंतु, उपचारादरम्यान हादीची प्राणज्योत मालवली.

एपस्टीन फाईल्सचा हादरा भारताला बसणार; पंतप्रधान मोदींच नाव घेत पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा

हादी याचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी बांग्लादेशात पसरली आणि बघता बघता हिंसाचाराचा आगडोंब उसळला. चौकशीदरम्यान अशी माहिती समोर आली की, ढाकाबाहेरील एका रिसॉर्टमध्ये मारेकरी फैजल आणि त्याची प्रेयसी मारिया अख्तर थांबले होते. त्यावेळी फैजल करीमने हल्ल्याच्या आदल्या रात्री म्हणजेच 11 डिसेंबर रोजी आपल्या प्रेयसीला सांगितले होते की, अशी एक घटना घडणार आहे, ज्यामुळे संपूर्ण बांगलादेश हादरून जाईल. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, फैजलने हादीचा व्हिडीओही प्रेयसीला दाखवला होता. यावरून हा मोठ्या कटाचा भाग असल्याचे मानले जात आहे.

निदर्शन, हिंसा अन् हल्ले; कोण आहे शरीफ उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूनंतर बांगलादेश पुन्हा पेटला

त्यानंतर 12 डिसेंबर रोजी हादीवर गोळ्या झाडण्यात आल्या. यात हादी गंभीर जखमी झाला. उस्मान हादीच्या मृत्यूनंतर बांग्लादेशमध्ये हिंसाचार उसळला असताना मुख्य आरोपी फैजल करीम आणि त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये बांग्लादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या, त्यापूर्वीच अस्थिर वातावरण तयार झाले आहे.

सरकार पुन्हा बदलण्याच्या मोडमध्ये

खरंतर, ही संपूर्ण कहाणी 12 डिसेंबर रोजीच्या एका घटनेने सुरू होते. शेख हसीनाच्या सत्ता उलथवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे विद्यार्थी नेते उस्मान हादी यांना गोळ्या घालण्यात आल्या. त्यानंतर हादीला चांगल्या उपचारांसाठी सिंगापूरला नेण्यात आले. सहा दिवस सतत उपचार सुरू असताना हादीचा मृत्यू झाला. त्यानंतर आता बांग्लादेश पुन्हा एकदा संक्रमणाच्या टप्प्यात आहे. पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. विद्यार्थी नेता उस्मान हादी यांची हत्येनंतर आणि उसळलेल्या हिंसाचाराची परिस्थिती बघता येथे पुन्हा एकदा सतांत्तर होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Exit mobile version