Bangladesh Fire : बांगलादेशात 7 मजली इमारतीला भीषण आग (Bangladesh Fire) लागल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 44 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 22 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. बांग्लादेशचे आरोग्यमंत्री सामंत लाल सेन यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. या घटनेत जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढणार असल्याची शक्यता आहे.
सोपा विषय : सुप्रीम कोर्टाचा ‘पतंजली’ला जबर दणका; रामदेव बाबांनाही झाप झाप झापलं, नेमकं प्रकरण काय?
बांग्लादेशातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या रेस्टॉरंटला गुरुवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. त्यानंतर काही क्षणातच या आगीने रौद्र रुप धारण केलं. इतर मजल्यांपर्यंत ही आग पोहोचली. इतर मजल्यांवर कपड्यांची दुकाने होती.
a href=”https://letsupp.com/entertainment/singer-rahul-deshpande-starrer-amaltash-marathi-movie-trailer-musical-treat-to-fans-134179.html”>‘अमलताश’चं नवं पर्व नेमकं कसा होता? सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडेनी थेटच सांगितलं… < या दुकांनांनीही पेट घेतल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, अग्निशामक दलाकडून आत्तापर्यंत 75 जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यातील 42 लोकांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेनंतर बचावासाठी अग्निशमन दलाच्या 13 तुकड्या तैनात आहेत. https://www.youtube.com/watch?v=BxUoohztRik या दुर्घटनेनंतर आरोग्य मंत्री सेन म्हणाले, 'ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये 33 जणांचा मृत्यू झाला असून शेख हसीना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न अँड प्लास्टिक सर्जरीमध्ये १० जणांचा मृत्यू झाला. दोन्ही आरोग्य सुविधांमध्ये २२ जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सेन यांनी सांगितलं आहे.