Bangladesh Protest : बांगलादेशात गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्यावरून हिंसाचार (Bangladesh Protest) सुरू आहे. या हिंसाचारामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. माहितीनुसार त्यांनी देश सोडला असून शेख हसीना भारतात दाखल झाले आहे.
तर दुसरीकडे आता बांगलादेशाची कमान लष्करच्या हातात गेली आहे. याबाबत माहिती बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी दिली आहे. याच बरोबर संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेख हसीना ( Sheikh Hasina) भारतातील पश्चिम बंगालमध्ये पोहोचले आहे तर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये ते आगरतळा येथे पोहोचले असल्याची माहिती समोर आली आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू असणाऱ्या हिंसाचारादरम्यान बांगलादेशात आतापर्यंत 14 पोलिसांसह सुमारे 300 जणांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत हजारो लोक जखमी झाले आहे.
परमवीर सिंह अन् फडणवीसांमध्ये डील? देवेंद्र फडणवीसांनी एकाच वाक्यात विषय संपवला
सध्या बांगलादेशात परिस्थिती खूपच बिकट झाल्याने संपूर्ण देशात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच बरोबर सरकारने देशात 5 ऑगस्टपासून तीन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. याच बरोबर संपूर्ण देशात मोबाईल सेवा देखील बंद करण्यात आली आहे.
अंतरिम सरकार चालवेल : लष्करप्रमुख
शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशात सध्या अंतरिम सरकार असणार असल्याची माहिती देखील बांगलादेशचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल वॉकर-उझ-जमान यांनी दिली.
याबाबत बोलताना ते म्हणाले की, शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर एक बैठक झाली ज्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी लष्करासोबत चर्चेला उपस्थित होते आणि या चर्चेनंतर अंतरिम सरकार देश चालवणार असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच देशात आज रात्रीपर्यंत संकट दूर होईल. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना शांत राहून आपापल्या घरी जाण्याची विनंती केली आहे.