Attack on Pakistani Army Convoy : पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक (Pakistan Train Hijack) झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा धक्कादायक घटना घडली आहे. बलुचिस्तान प्रांतात (Baluchistan) पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी (Pakistani Army Convoy) बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचे तब्बल 90 जवान मारले गेल्याची माहिती आहे. या घटनेने पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर बीएलएने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. यात हल्ल्याची जबाबदारी घेत असल्याने बीएलएने घेतली आहे.
द बलुचिस्तान पोस्टनुसार नोशिकी भागात हा हल्ला झाला. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार आरसीडी महामार्गावर सैन्याच्या ताफ्यावर हा हल्ला झाला. येथे एकामागोमाग एक स्फोट झाले नंतर अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. या हल्ल्यानंतर अनेक रुग्णवाहिका आणि सुरक्षा दलांना घटनास्थळाकडे जाताना पाहण्यात आले. या घटनेनंतर रुग्णालयांत आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
या हल्ल्याची जबाबदाची बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली आहे. बीएलएचे प्रवक्ते जीयंद बलूचने सांगितले की बीएलएच्या मजीद ब्रिगेडने काही वेळापूर्वी नोशिकीत आरसीडी महामार्गावर रसखान मिलजवळ पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला केला. या ताफ्यात आठ बसेस होत्या यातील एक बस पूर्णपणे नष्ट झाली. या हल्ल्यात 90 सैनिकांना ठार केले आहे असा दावा बीएलएने केला आहे. हल्ल्यानंतर लगेचच बसला घेराव घालण्यात आला आणि बसमधील सैनिकांवर हल्ला करून त्यांना ठार मारण्यात आले.
भारत अन् बलुचिस्तानला चीनच्या प्रोजेक्टचा धोका; अपहरणकर्त्यांच्या रडारवर होता ‘सीपेक’?
बीएलएने 12 मार्च रोजी क्वेटा येथून पेशावरकडे जाणारी जाफर एक्सप्रेस ही रेल्वेच हायजॅक केली होती. या रेल्वेत 400 पेक्षा जास्त प्रवासी होते. बलूच नेत्यांची सुटका आणि बलुचिस्तानातून पाकिस्तानी अधिकारी हटवावेत अशी मागणी बीएलएने केली होती. या मागणीसाठी पाकिस्तान सरकारला 48 तासांची मुदत देण्यात आली होती. परंतु, यानंतर पाकिस्तानी सैन्याने मोहीम सुरू केली. तीस तासांनंतर सर्व बंधकांची सुटका केल्याचा दावा केला.