Download App

Israel War : मोठी बातमी! इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षणमंत्री कॅट्झ यांची माहिती

पोलिसांनी सांगितलं की, ज्यावेळी बॉम्बहल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान नेतन्याहू हे घरात नव्हते आणि त्यांचं कुटुंबही घरामध्ये नव्हतं.

  • Written By: Last Updated:

Bomb Attack on Benjamin Netanyahu Home :  इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या घरावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर भागात असलेल्या कैसरिया शहरात हा हल्ला झाला आहे. (Netanyahu) पंतप्रधानांच्या घराच्या दिशेने दोन फ्लॅश बॉम्ब टाकण्यात आले होते. ते बॉम्ब घराच्या बागेत पडले. इस्रायली पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

पोलिसांनी सांगितलं की, ज्यावेळी बॉम्बहल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान नेतन्याहू हे घरात नव्हते आणि त्यांचं कुटुंबही घरामध्ये नव्हतं. शिवाय बॉम्बहल्ल्यामुळे घराचं कुठलंही नुकसान झालेलं नाही. संरक्षणमंत्री कॅट्झ यांनी रविवारी पहाटे एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. बॉम्बहल्ल्याच्या घटनेने सगळ्या रेड लाईन ओलांडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आणि न्यायिक संस्थांना सर्व आवश्यक ते पावलं उचलण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

मोठी बातमी! इस्त्रायलच्या हल्ल्यात हमासचा म्होरक्या सिनवार ठार; पंतप्रधान नेत्यानाहुंची घोषणा

इस्रायली राष्ट्रपती इसहाक हर्जोग यांनी एक्स घटनेचा निषेध नोंदताना म्हटलं की, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. सुरक्षा मंत्री इतामार बेन गविर यांनी एक्स अकाऊंटवरुन लिहिलं की, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधात चिथावणीच्या सगळ्या मर्यादा ओलांडण्यात आलेल्या आहेत.

ऑक्टोबरमध्ये ड्रोनहल्ला

यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात कैसरियामध्ये पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घराच्या दिशेने एक ड्रोन लाँच करण्यात आलेला होता. त्यामुळे कोणतंही नुकसान झालेलं नव्हतं. उत्तर भागात इस्रायली सेनेने ऑक्टोबर २०२३ पासून लेबनानचं दहशतवादी संघटन हिज्बुल्लाहसोबत युद्ध पुकारकलं आहे.

follow us