Brazil Road Accident : अपघातांची मालिका जगभरातच सुरू आहे. आताही ब्राझीलमधून अशीच एक धक्कादायक (Brazil News) बातमी समोर आली आहे. ब्राझीलमधील मिनस गॅरेस राज्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात किमान ३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जण जखमी झाले आहेत. एका वाहनाचे टायर फुटून हा अपघात झाल्याचे (Road Accident) सांगितले जात आहे. टायर फुटल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस एका ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की ३८ लोकांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली.
Brazil Flood : ब्राझीलमध्ये पूर अन् पावसाचे थैमान; 57 लोकांचा मृत्यू, हजारो बेघर
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये ४५ प्रवासी होते. ही बस साओ पावलो शहराकडे निघाली होती. रस्त्यात असतानाच अचानक टायर फुटला काय होतय हे कळायच्या आत चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही बस ट्रकवर जाऊन धडकली. यानंतर एक भरधाव वेगातील कारही बसला येऊन धडकली. या कारमध्ये तीन प्रवासी होते. या प्रवाशांना मात्र कोणतीही इजा झाली नाही. ही घटना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली.
या अपघाताचे फोटो आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये कारवर ट्रक असल्याचे दिसत आहे. कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. मिनस गॅरेस अग्निशमन विभागाने सांगितले की हा अपघात बीआर 116 या महामार्गावर झाला. अपघातानंतर बसला आग लागली होती. या आगीत बस जळून खाक झाली. या अपघातातील जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृत्यूची संख्या आणखी वाढू शकते अशी भीती व्यक्त होत आहे.
दक्षिण अमेरिकेतील ब्राझील या देशात रस्ते अपघातांचे प्रमाण खूप जास्त आहे. २०२१ या वर्षात अपघातातील मृत्यू दर १५.७ टक्के इतका होता. अर्जेंटिनाच्या तुलनेत ८.८ हा दर जवळपास दुप्पट आहे. २०३० पर्यंत देशातील रस्ते अपघातांतील मृत्यू दर निम्म्याने कमी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या घटनेमुळे ब्राझीलमधील रस्ते अपघातांचं वास्तव समोर आलं आहे.
धक्कादायक! ब्राझीलमध्ये प्रवासी विमान कोसळले, तब्बल 62 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू