China News : काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात काळ्या सोन्याचे भांडार सापडल्याची बातमी तुम्ही ऐकली असेलच. आता अशीच बातमी चीनमधून समोर आली आहे. चीनमध्ये काळ सोनं नाही तर खरखुर सोनं सापडलं आहे अन् तेही मुबलक प्रमाणात. आजमितीस चीनमध्ये (China News) जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा सापडला आहे. चीनच्या हूनान प्रांतात हा सोन्याचा साठा सापडला (Gold Mine) आहे. या साठ्यामध्ये जवळपास एक हजार टनांपेक्षा जास्त सोने असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोन्याची ही खाण जमिनीच्या साधारण तीन किलोमीटर खोल भागात सापडली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी (China Economy) तर मिळेलच शिवाय देशांतर्गत सोन्याची मागणी देखील पूर्ण करता येणार आहे.
शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार हुनान भूविज्ञान अकॅडमीने सोन्याची खाण शोधून काढली आहे. हा साठा पिंगजियांग काउंटी भागात आहे. जमिनीच्या आत तीन किलोमीटर एक हजार टनापेक्षा जास्त सोने आहे अशी शक्यता आहे. या सोन्याची किंमत किमान 82 अब्ज डॉलर्स इतकी असेल असा अंदाज आहे. बहुदा चीनमधील हा सर्वात मोठा साठा असावा असे सांगितले जात आहे. दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) साऊथ डीप खाणीपेक्षाही हा साठा मोठा आहे. या ठिकाणी जवळपास 900 टन सोने आहे. चीनमधील खाणीत यापेक्षा जास्त सोने असल्याचा अंदाज आहे.
भ्रष्टाचार केला तर सुट्टी नाहीच, 10 वर्षांत तब्बल 50 लाख लोकांना शिक्षा; चीनमध्ये काय घडतंय?
वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या डेटानुसार चीन जगातील सर्वात मोठा सुवर्ण उत्पादक देश आहे. 2023 मध्ये जगातील एकूण सोन्याच्या उत्पादनात चीनचा वाटा दहा तक्के इतका होता. या वर्षातील पहिल्या तीन तिमाहीत चीनने 741 टन सोन्याचा वापर केला तर याच काळात सोन्याचे उत्पादन 268 टन इतके होते. म्हणजेच देशांतर्गत सोन्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सोने आयात (Gold Import) करावे लागते.
हूनानआधी सोन्याचे मोठे साठे दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, रशिया, पापुआ न्यू गिनी, चीली, अमेरिका, पश्चिम ऑस्ट्रेलिया, डॉमिनिक गणराज्य या देशांत सापडले आहेत. साऊथ डीप गोल्ड माइन, ग्रासबर्ग गोल्ड माइन आणि ऑलिम्पियाडा गोल्ड माइन यांसारख्या खाणी सोन्याचे उत्पादन आणि साठ्यात आघाडीवर आहेत.
भारतातील कर्नाटक राज्यात बहुतांश सोन्याचे साठे आहेत. येथे कोलार एहुट्टी आणि उटी येथील खाणीतून मोठ्या प्रमाणात सोने काढले जाते. यामध्ये कोलार गोल्ड माइन प्रसिद्ध आहे. या खाणीवर आधारित चित्रपटही बनला आहे. कोलार गोल्ड फिडला 2001 मध्ये बंद करण्यात आले होते. या खाणीतून 120 वर्षांच्या इतिहासात 800 टन पेक्षा जास्त सोने काढण्यात आले.
पाकिस्तानला मिळालं काळ्या सोन्याचं घबाड पण, समोर आलं हे संकट.. वाचा, काय घडतंय शेजारी?
मागील काही दिवसांपासून जगभरातील देश त्यांच्याकडील सोन्याच्या साठ्यात वाढ करताना दिसत आहेत. यामध्ये भारत आणि चीनचा ही समावेश आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (reserve Bank of India) सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत 855 टन सोन्याचा साठा होता. जगभरात भू राजकीय तणाव वाढल्याने बहुतांश देशांनी सोने साठा वाढवण्यावर भर दिला आहे. सोन्यातील गुंतवणूक नेहमीच सुरक्षित समजली जाते. त्यामुळे डॉलर वरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने जगभरातील देशांनी सोन्यात गुंतवणूक करण्यावर भर दिला आहे.