Download App

डोनाल्ड ट्रम्प यांचं पुढचं पाऊल, भारतासोबत तडजोडीलाही नकार; ट्रेड डीलवर घेतला ‘हा’ निर्णय

आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबरोबर ट्रेड निगोशिएशन करण्यासही स्पष्ट नकार दिला आहे.

Donald Trump Latest News : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) भारताच्या बाबतीत अतिशय ताठर भूमिका घेतली आहे. ट्रम्प प्रशासनाने भारतावर 50 टक्के टॅरिफ आकारला (Tariff on India) आहे. यानंतर आता ट्रम्प यांनी भारताबरोबर ट्रेड निगोशिएशन करण्यासही स्पष्ट नकार दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले जोपर्यंत टॅरिफवर वाद कायम आहे याबाबत तोडगा निघत नाही तोपर्यंत भारताबरोबरील ट्रेड डील स्थगित राहील. ट्रम्प यांनी गुरुवारी ओव्हल ऑफीस येथे पत्रकारांशी संवाद साधला. जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सोडवला जात नाही तोपर्यंत ट्रेड डीलवर कोणतीही चर्चा होणार नाही असे ट्रम्प यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने भारताची मोठी कोंडी झाली आहे.

ट्रम्प प्रशासनाने भारतावरील टॅरिफ 50 टक्के केला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कालच प्रतिक्रिया दिली होती. देशातील शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही. शेतकऱ्यांचे हित आमच्यासाठी सर्वोपरि आहे. भारत शेतकरी, पशुपालकांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही असे पीएम मोदी म्हणाले होते.

ट्रम्पला सुट्टी नाही! शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार, PM मोदींचा इशारा

भारतावर 50 टक्के टॅरिफ

भारतावर 50 टॅरिफ लावण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केली आहे. 30 जुलै रोजी भारतावर 25 टक्के टॅरिफ (India Tariff) लावण्याची घोषणा केली होती तर आता त्यांनी भारतावर 50 टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी मंगळवारीच सांगितले होते की मी पुढील 24 तासांत भारतावरील टॅरिफ वाढवणार आहे.

ट्रम्पची इच्छा आहे की भारताने रशियाकडून (Russia) तेल खरेदी करू नये. त्यामुळे गेल्याकाही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामध्ये व्यापारी तणाव दिसून येत आहे. यापूर्वी देखील अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर रशियन तेल खरेदी करण्याचा आरोप करत 24 तासांच्या आता भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. तर आता ट्रम्प यांनी भारतावर 25 अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेकडून लावण्यात आला आहे.

अमेरिकेचा निर्णय अन्यायकारक : भारत

इतर अनेक देशांनी स्वतःच्या राष्ट्रीय हितासाठी केलेल्या कृतींसाठी अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही पुन्हा सांगतो की ही कृती अन्यायकारक आणि अवास्तव आहे. भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक सर्व पावले उचलेल असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

“अमेरिकेचा निर्णय अन्यायकारक आता आम्ही..”, टॅरिफ लादल्यानंतर भारताचंही रोखठोक उत्तर

follow us