Canada News : कॅनडा सरकारने असा एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे तिथे राहणाऱ्या भारतीयांच्या अडचणी वाढणार (Canada News) आहेत. कॅनडात अस्थायी नोकरी करणाऱ्या विदेशी लोकांची संख्या कमी करण्यात येणार आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी (Justin Trudeau) सोमवारी याबाबत घोषणा केली. या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम कॅनडात काम करणाऱ्या भारतीय युवकांवर होणार आहे. कॅनडात काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.
या निर्णयाची माहिती देण्यासाठी जस्टिन ट्रूडो यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. आम्ही कॅनडात अस्थायी रूपात काम करणाऱ्या विदेशी लोकांची संख्या कमी करणार आहोत. देशाचे लेबर मार्केट आता बरेच बदलले आहे. आता वेळ आली आहे की कॅनडातील कंपन्या कॅनडातील नागरिकांसाठी जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करतील.
India Canada : कॅनडाला शहाणपण येईना! ‘त्या’ आरोपांनंतर भारताची चौकशी करणार; नवा वाद काय?
एका रिपोर्ट नुसार ऑगस्ट 2024 अखपर्यंत कॅनडात भारतीय नागरिकांची संख्या वीस लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सन 2022 मध्ये 1,18,095 भारतीय नागरिक कॅनडात स्थायी निवासी बनले आहेत. तर 59,503 लोक कॅनडाचे नागरिक बनले आहेत. 2024 मधील पहिल्या तिमाहीत कॅनडाने 37,915 नव्या भारतीय स्थायी निवासी लोकांना प्रवेश दिला. 2023 मधील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ही संख्या 8175 ने कमी आहे.
कॅनडाच्या सरकारवर देशातील अस्थायी निवासी लोकांना नियंत्रित करण्यासाठी दबाव आहे. मागील काही वर्षात या लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. आता पुढील वर्षात कॅनडात निवडणुका आहेत. आता जे सर्वे होत आहेत त्यात पंतप्रधान जस्टीन ट्रुडो पिछाडीवर असल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे ट्रुडो सरकारचंही टेन्शन वाढलं आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारकडून जनतेला खूश करण्यासाठी काही निर्णय घेतले जात आहे. ट्रुडो यांनी सोमवारी केलेली घोषणा हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले जात आहे.
कॅनडा पोलिसांची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक
कॅनडा सरकार तेथील विदेशी कामगारांना देशाबाहेर काढण्याचा प्लॅन करत आहे. यासाठी 2022 मधील एक निर्णय बदलण्यात आला आहे. कॅनडा सरकारच्या रोजगार आणि सामाजिक विकास विभागानुसार 2023 मध्ये 1 लाख 83 हजार 820 अस्थायी विदेशी कर्मचाऱ्यांना देशात येण्याची परवानगी देण्यात आल. 2019 च्या तुलनेत यामध्ये तब्बल 88 टक्क्यांची वाढ झाली आहे.