Download App

Charlie Kirk : मारेकऱ्यांना सोडले जाणार नाही; खास ‘मोहऱ्या’च्या हत्येनंतर ट्रम्प यांचा इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहाय्यक चार्ली कर्क यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कर्क यांच्या हत्येनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी शोक व्यक्त केला.

  • Written By: Last Updated:

Donald Trump On Charlie Kirk Death : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आणि उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते चार्ली कर्क यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर ट्रम्प (Donald Trump) यांनी मारेकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. याबाबत ट्रम्प यांनी एक व्हिडिओदेखील पोस्ट केला आहे.

लोकशाही असणाऱ्या देशांमध्ये अशांततेचं ‘मळभ’; वर्षभरात ९४ देशांमध्ये कमकुवत झाली ‘डेमोक्रॉसी’

कर्क यांची हत्या नेकमी कशी झाली?

चार्ली उटाह राज्यातील उटाह व्हॅली विद्यापीठात एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. त्यावेळी अचानक एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी कर्क यांच्या मानेला लागल्याने ते जमिनीवर कोसळले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने चार्ली यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

चार्ली यांच्या हत्येसाठी कट्टरपंथी डावे जबाबदार

चार्ली यांच्या हत्येनंतर अमेरिकेच्या (America) राष्ट्राध्यक्षांनी या घटनेबाबत एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. ज्यात त्यांनी कर्कच्या हत्येसाठी “कट्टरपंथी डाव्या” पक्षांना जबाबदार धरले आहे. ज्यांनी ही हत्ये घडवली त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नसल्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. चार्लीच्या हत्येमुळे प्रत्येकजण दुःखाने आणि संतापाने भरलेला आहे. चार्ली यांनी स्वातंत्र्य, लोकशाही, न्याय आणि अमेरिकन लोकांसाठी लढा दिल्याचे ट्रम्प यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

सत्य आणि स्वातंत्र्यासाठी चार्ली शहीद झाले असा उल्लेख करत तरुणांनी इतका आदर केलेला कोणीही माणूस कधीच नव्हता असे ट्रम्प म्हणाले. या दुःखाच्या आणि वेदनेच्या प्रसंगात आम्ही सर्वजण चार्ली यांच्या कुंबियांसोबत आहोत. चार्ली यांची हत्या हा अमेरिकेसाठी एक काळा क्षण आहे. कट्टरपंथी डाव्यांनी चार्लीसारख्या अमेरिकन लोकांची तुलना नाझींशी आणि जगातील सर्वात वाईट सामूहिक खुनी आणि गुन्हेगारांशी केली आहे,” असेही ट्रम्प यांनी म्हटलंय. माझे प्रशासन या अत्याचारात आणि इतर राजकीय हिंसाचारात योगदान देणाऱ्या सर्वांचा शोध घेईल असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

follow us