New Covid 19 Virus in China : कोरोना आजाराचं संकट जगातील कोणताच माणूस विसरू शकत नाही. या आजाराने जगाची अर्थव्यवस्था संकटात सापडली. अनेकांचे रोजगार गेले. लाखो लोकांचा मृ्त्यू झाला. आता पुन्हा नव्या आजाराचे संकट घोंगावू लागले आहे. चीनच्याच एका प्रयोगशाळेत कोविड 19 चा नवा व्हायरस सापडला आहे. चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑप व्हायरोलॉजीच्या संशोधकांनी नव्या कोरोना विषाणूचा शोध लावला आहे. हा विषाणू कोविड 19 ला जबाबदार असणाऱ्या विषाणुसारखाच आहे. हा विषाणू मानवी आरोग्याला धोकादायक ठरू शकतो.
ब्लूमबर्गमधील रिपोर्टनुसार नवीन व्हायरस अजून तरी माणसांत आढळून आलेला नाही. हा व्हायरस संशोधकांना रिसेप्टरच्या माध्यमातून पेशींत प्रवेश करतो. यांचा उपयोग कोविड 19 व्हायरस देखील करतो. हा विषाणू माणसांत आढळून येणाऱ्या एका प्रोटीनशी स्वतःला जोडून घेत कोशिकांना (पेशी) संक्रमित करतो. हा व्हायरस मिडील ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) मुळे तयार होणाऱ्या कोरोना व्हायरस परिवाराशी संबंधित आहे.
Corona Vaccine मुळे हार्ट अॅटॅकचे प्रमाण वाढले? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण
हा शोध मंगळवारी सेल नावाच्या पत्रिकेतील एका पेपरमध्ये प्रकाशित करण्यात आला. हा व्हायरस प्राण्यांतून माणसांत फैलावण्याचीही शक्यता काळजी वाढवू शकते असे यात म्हटले आहे. एमईआरएस व्हायरसची 2012 पासून मे 2024 पर्यंत जवळपास 2600 लोकांमध्ये पुष्टी करण्यात आली आहे. या व्हायरसने संक्रमित झालेल्या 36 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाइटनुसार या व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण सऊदी अरब देशात आढळून आले आहेत.
वुहान व्हायरस रिसर्च सेंटर जगभरात प्रसिद्ध आहे. याच प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस लीक होऊन जगभरात पसरला असा आरोप चीनवर होत असतो. चीनने मात्र या आरोपांचा स्वीकार कधीच केला नाही. वादानंतर 2023 मध्ये अमेरिकेने या प्रयोगशाळेसाठीचा निधी रोखला होता. त्यामुळे या प्रयोगशाळेकडे जगभरातून संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे.
चीनमध्ये नवा व्हायरस सापडल्याची बातमी बाहेर येताच शेअर बाजारावर परिणाम जाणवला. लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. मॉडर्ना इंकच्या शेअर्समध्ये 6.6 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. नोवावॅक्स इंकच्या शेअर्समध्ये 7.8 टक्क्यांची वाढ झाली.
चीनमधूनच का पसरतात जीवघेणे व्हायरस? जाणून घ्या 4 धक्कादायक कारणे