Corona Vaccine मुळे हार्ट अॅटॅकचे प्रमाण वाढले? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण
Corona Vaccine : कोरोनाच्या साथीचा हा एंडेमिक काळ सुरू झाला आहे. मात्र अद्याप देखील शास्त्रज्ञ या व्हायरसवर नजर ठेऊन आहेत. या दरम्यान एक अहवाल समोर आला आहे की, कोरोना लसीमुळे ह्रदयविकाराच्या झटक्याच प्रमाण वाढलं आहे. कोरोना लस आणि हार्ट अॅटॅकचे प्रमाण यांच्या अभ्यासासाठी चार वेगवेगळे अभ्यास केला आहे. मात्र हा दावा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी फेटाळला आहे. (Corona Vaccine Heart Attack Health Minister Mansukh Mandviya Explain )
राष्ट्रवादी सोडणार? शिरसाटांच्या दाव्यावर जयंत पाटलांनी खरं सांगून टाकलं
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी मंगळवारी 20 जूनला यावर स्पष्टीकरण दिलं आहे. की, कोरोना लसीच्या संशोधनापासून ते लसीकरण करण्यापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तात करण्यात आली आहे. विविध भौतिक आणि सामान्या प्रक्रियांमुळे लस बनवायला आणि मान्यता मिळवायाला वेळ लागत होता. मात्र आता आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या वापराने ही प्रक्रिया सोपी झाली.
CM शिंदेंचा ढाण्या वाघ शंभुराज देसाई पराभूत होणार; शरद पवारांचा पठ्ठ्या विधानसभेत दिसणार!
पुढे ते असं देखील म्हणाले की, कोरोना लसीमुळे ह्रदयविकाराच्या झटक्यांच प्रमाण वाढलं आहे. असा दावा करण्यात येत आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी या लसीच्या संशोधनापासून ते लसीकरण करण्यापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये शास्त्रिय पद्धतीचा वापर केला आहे. भारतातील लसींसाठी त्याच आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तात करण्यात आली आहे. ज्याची जगातील अतर लसींसाठी केली गेली.
दरम्यान त्यांनी भारतात कोरोना लसींना तात्काळ आणि घाईघाईत मिळालेल्या परवानग्यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर देखील उत्तर दिलं. ते म्हणाले की, कोरोना लसींना तात्काळ परवानग्या देण्यात आल्या कारण आता जुन्या काळाप्रमाणे किटकट प्रकियेने लस बनत नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या वापराने ही प्रक्रिया सोपी झाली. त्यामुळे लस तयार करण्याची प्रक्रिया जलद झाल्याने तीला परवानगी देखील लवकर मिळते.