CM शिंदेंचा ढाण्या वाघ शंभुराज देसाई पराभूत होणार; शरद पवारांचा पठ्ठ्या विधानसभेत दिसणार!

CM शिंदेंचा ढाण्या वाघ शंभुराज देसाई पराभूत होणार; शरद पवारांचा पठ्ठ्या विधानसभेत दिसणार!

पाटण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुलूख मैदानी तोफ अशी ओळख असलेले राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांचा आगामी निवडणुकीत पाटणमधून पराभव होणार असल्याचा धक्कादायक अंदाज एका सर्वेक्षणात वर्तविण्यात आला आहे. ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Arena India Survey) या राजकीय संस्थेने हा सर्व्हे केला आहे. कर्नाटकमधील अचूक सर्व्हेमुळे ही सर्वेक्षण संस्था चर्चेत आली होती. (News Arena India Survey Patan Assembly Constituency Shambhuraj Desai vs Satyajeet Patankar)

या सर्व्हेनुसार, 2024 मध्ये पाटणमधून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येण्याचा अंदाज आहे. यावेळीही गतनिवडणुकांप्रमाणे सत्यजीत पाटणकर हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटणकर यांचा विधानसभेत प्रवेश निश्चित मानला जात आहे.

News Arena India Survey : पृथ्वीराज चव्हाण 2024 मध्ये पराभूत होणार? भाजपसाठी गुड न्यूज

पाटण विधानसभा मतदारसंघ हा सातारा जिल्ह्यातील खेडोपाड्यांमधील आणि घाटमाथ्यावरील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. इथे सुरुवातीला शंभुराज देसाई यांचे आजोबा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब देसाई यांचे एकहाती वर्चस्व होते. त्यांच्या निधनानंतर पाटण हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर यांचा बालेकिल्ला बनला. पाटणकर 1985 पासून ते आजपर्यंत समाजवादी काँग्रेस, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षांमधून इथून 5 वेळा निवडून गेले आहेत.

या दरम्यान, 1995 मध्ये शंभुराज देसाई यांनी विधानसभेच्या मैदानात उडी घेतली. त्यानंतर विक्रमसिंह पाटणकर आणि देसाई यांच्यात कायमच अटीतटीची लढत पाहायला मिळते. 1995 मध्ये अपक्ष शंभुराज अवघ्या 736 मतांनी पराभूत झाले. तर 1999 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर असलेल्या देसाईंना 2 हजार 563 मतांनी पराभव पहावा लागला. 2004 मध्ये मात्र शंभुराज देसाईंनी तब्बल 5 हजार 851 मतांनी बाजी मारली. त्यानंतर 2009 मध्ये पुन्हा विक्रमसिंह पाटणकर यांनी 580 मतांनी बाजी मारली.

शहाजीबापू पाटलांसाठी 2024नॉट ओक्के ; शेकाप बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेणार

2014 नंतर विक्रमसिंह पाटणकर यांनी त्यांचा मुलगा सत्यजीत पाटणकर यांना मैदानात उतरवायला सुरुवात केली. मात्र 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये शंभुराज यांनी मोठ्या मताधिक्याने बाजी मारली आहे. मात्र या सर्व्हेनुसार, 2024 मध्ये पाटणमधून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येण्याचा अंदाज आहे. यावेळीही गतनिवडणुकांप्रमाणे सत्यजीत पाटणकर हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube