Download App

‘टॅरीफ’ने चीनचा तिळपापड! अमेरिकेचा प्लॅन लक्षात येताच जगातील देशांना धमकी; काय घडलं?

टॅरिफच्या निर्णयामुळे चिनी राज्यकर्त्यांचा तिळपापड झाला आहे. यातच आता चीनने जगभरातील देशांना धमकीच देऊन टाकली आहे.

US China Trade War : अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध लवकर मिटेल (US China Trade War) अशी शक्यता आता मावळत चालली आहे. अमेरिकेने चिनी वस्तूंवरील टॅरिफ आता थेट 245 टक्के (Reciprocal Tariff) केला आहे. तर चीननेही अमेरिकी वस्तूंवर 125 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर चीनसाठी अमेरिका खूप मोठा बाजार आहे. अमेरिकेत चीनच्या वस्तूंना मोठी मागणी आहे. या व्यवहारातून चीन मोठा नफा मिळवत होता. पण आता ट्रम्प सरकारने (Donald Trump) चिनी वस्तूंवर थेट 245 टक्के टॅरिफची घोषणा केली आहे. त्यामुळे अमेरिकेबरोबर व्यापार करणे आता चीनला शक्य होणार नाही.

ट्रम्प सरकारच्या या निर्णयामुळे चिनी राज्यकर्त्यांचा तिळपापड झाला आहे. यातच आता चीनने जगभरातील देशांना धमकीच देऊन टाकली आहे. चीनच्या हितांकडे दुर्लक्ष करून अमेरिकेशी ट्रेड डील करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशांवर कारवाई करू अशी धमकी चीनने दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’ ब्रेक मागे वेगळाच प्लॅन; चीनवर दबाव अन् जगभरात बिजनेस डील..

चीनचे सरकारी न्यूज एजन्सी शिन्हुआच्या रिपोर्टनुसार चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने चीन वगळता बाकीच्या देशांवर टॅरिफ लादण्याच्या निर्णयाला तीन महिन्यांची स्थगिती दिली आहे. काही कर सवलती दिल्या आहेत. या बदल्यात आता या देशांनी चीनबरोबरील व्यापारिक संबंध कमी करावेत असा दबाव टाकला जात आहे. तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. यावर आता चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चीन अशा कोणत्याही कराराचा कडाडून विरोध करेल. जर अशी कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तर चीनकडून विरोध केला जाईलच शिवाय योग्य प्रत्युत्तर देखील दिले जाईल. चीन आपल्या हितांचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहे असेही या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

अमेरिका सध्या त्याच्या व्यापारिक भागीदार देशांवर मनमानी पद्धतीने टॅरिफ आकारत आहे. तसेच या देशांवर चर्चा करण्यासाठी दबाव सुद्धा टाकत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि अर्थव्यवस्थेवर एकतर्फी दबाव बनवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे असा आरोप चिनी प्रवक्त्याने केला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने मागील आठवड्यात म्हटले होते की अमेरिका शुल्क चर्चेचा वापर करून डझनभर देशांवर दबाव बनवण्याची योजना आखत आहे. जपान आणि आसियानसहीत अनेक देशांचा चीन आणि अमेरिकेबरोबर व्यापार आहे.

टॅरिफनंतर ट्रम्प सरकारचे नवे फर्मान! 8 मुद्द्यांची नॉन-टॅरिफ फ्रॉड यादी जाहीर, वाचा सविस्तर..

follow us