China Earthquake : चीनमध्ये सध्या भुकंपांचे सत्र सुरू (China Earthquake) आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी काही प्रांतात जोरदार भूकंप झाला. किर्गीस्तान-शिनजियांग प्रांताच्या सीमेजवळ हा भूकंप झाला. भुकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. कालही भूकंप (Earthquake) झाला होता. हा भूकंप जास्त शक्तिशाली होता. परंतु, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या आत 80 किलोमीटर खोल होता. तरीदेखील घरांचे नुकसान झाले काही लोकांचा मृत्यू झाला. जर्मन सेंटर फॉर जिओसायन्सेसने दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप इतक शक्तिशाली होता की जमिनीत 10 किलोमीटर खोल खड्डा पडला.
China Earthquake : चीनमध्ये शक्तिशाली भूकंप! 111 लोकांचा मृत्यू, शेकडो इमारती उद्धवस्त
मागील 48 तासांत हा दुसरा भूकंप आहे. पहाटेच्या वेळी घरांना धक्के जाणवू लागल्याने लोक भयभीत झाले आणि घराबाहेर आले. या भूकंपामुळे काही घरांचे नुकसानही झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू चीन-नेपाळ सीमेवर होता. या भूकंपाची तीव्रता रिश्चट स्केलवर 7.2 इतकी मोजण्यात आली. या भूकंपामुळे किती नुकसान झाले याची माहिती स्थानिक यंत्रणांकडून घेतली जात आहे.
दरम्यान, याआधी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारताची राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतात (Earthquake in Delhi) जोरदार भूकंपाचे धक्के बसले. अचानक झालेल्या या भूकंपाने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोक भीतीने घराबाहेर पळत सुटले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ-चीन सीमेजवळ होता. या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपामुळे भारतात कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नाही.
भूकंप का होतात?
पृथ्वीच्या आतील प्लेट्स एकमेकांवर आदळल्याने भूकंप होतो. पृथ्वी 12 टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. या प्लेट्स एकमेकांना आदळल्यास जी ऊर्जा बाहेर पडते त्यालाच भूकंप असे म्हणतात. या प्लेट्स भूगर्भात अत्यंत कमी गतीने सरकत असतात. वर्षाच्या हिशोबात सांगायचे झाले तर या प्लेट्स दरवर्षी त्यांच्या जागेवरून 4 ते 5 मिमी सरकतात. या काळात हालचाली होताना प्लेट्स एकमेकांवर आदळण्याचे प्रकारही घडतात. असे जर झाले तर आपल्याकडे भूकंप येतो, असे तज्ज्ञ सांगतात. याआधी नेपाळ आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. दिल्ली एनसीआरसह उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भूकंप झाला. येथील नागरिक भीतीपोटी घराबाहेर पळाले. या भूकंपात मात्र कोणतेही नुकसान झाले नाही.
Earthquake : उत्तर भारतात भूकंप! दिल्लीसह पंजाब, हरयाणा हादरला, लोकांची पळापळ