Download App

चीनचा संपूर्ण जगाला धोका; छोट्याशा देशानं ‘ड्रॅगन’ला ललकारलं

विनियस : चीनला (China)एका लहानशा देशाने चांगलेच खडसावले आहेत. लिथुआनियाचे (Lithuania)परराष्ट्र मंत्री गॅब्रिएलियस लँड्सबर्गिस (Foreign Minister Gabrielius Landsbergis)यांनी एकामागून एक ट्विट (Tweet) करत चीनची सत्यता जगाला सांगितली आहे. चीन जगासाठी कसा मोठा धोका निर्माण करत आहे, हे त्यांनी सांगितलं आहे. यासोबतच चीन रशियाला (Russia) मदत करत नसून आपले वाईट हेतू पूर्ण करण्यात अडकले आहे, असेही लँड्सबर्गिस यांनी म्हटलं आहे. लिथुआनिया हा युरोपमधील एक छोटासा देश आहे. म्हणजेच चीनपेक्षा हा देश खूपच छोटा आहे. क्षेत्रफळातही हा देश चीनपेक्षा लहान आहे, पण या छोट्या देशाने चीनला खडसावलं आहे.

पोलिस शिंदे-फडणवीस सरकारचे घरगडी झालेत, ठोंबरे-पाटील कडाडल्या…

काही दिवसांपूर्वी लिथुआनियाच्या भारतातील राजदूत डायना मिक्केव्हिसिन (Diana Mikkevisin)यांनी भारताच्या प्रादेशिक अखंडतेचे समर्थन केले होते, त्यानंतर आता लँड्सबर्गिस यांनी हे विधान केलं आहे. परराष्ट्र मंत्री लँड्सबर्गिस यांनी लिहिलंय की, चीन हा देश रशियालाही मदत करत नाही किंवा इतर कोणत्याही देशाला मदत करत नाही.

चीन फक्त स्वतःला मदत करतो. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे अमेरिका आणि युरोपीय शक्तींना पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या नव्या व्यवस्थेत अधिकाधिक देशांचा समावेश व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. लँड्सबर्गिस म्हणाले की, अध्यक्ष जिनपिंग यांना अमेरिका आणि युरोपीय देशांच्या शक्तींना पर्याय निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. चीनच्या नेतृत्वाखालील पूर्व आशिया, ईशान्य आशिया, दक्षिणपूर्व आशिया आणि मध्य आशियातील देशांचा समावेश करायचा आहे.

लँड्सबर्गिस यांच्या मते, चीनने मन वळवून मार्ग बदलण्याची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. अशाच धोरणामुळे चीनलाही प्रोत्साहन मिळेल. ते म्हणाले की, चीनने नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील हे जाणून घेतलं पाहिजे. जर तुमचा त्यांच्यावर विश्वास असेल तर तुम्हाला हे समजले पाहिजे की, या गोष्टींचा जगावर काय परिणाम होऊ शकतो.

Tags

follow us