चाइनीज व्यक्तीने AI च्या माध्यमातून केली कमाल! मृत आजीचे बनवले वर्चुअल वर्जन

China :  आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर सुरु झाल्यानंतर जगभरातील यूजर्स याबाबत नवनवीन प्रयोग करताना आपल्याला दिसत आहे. सध्या एका चाइनीज व्यक्तीने अनोखा प्रयोग केला आहे. त्याच्या या प्रयोगामुळे सगळेच हैरान झाले आहेत. चीनच्या या व्यक्तीने आर्टिफिशियल इंटेलिजंसच्या मदतीने आपल्या मृत झालेल्या आज्जीला जीवंत करण्याच्या प्रयत्न केला आहे. ही गोष्ट ऐकण्यासाठी वेगळी वाटेल, पण ही घटना खरी […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 18T170647.827

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 18T170647.827

China :  आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर सुरु झाल्यानंतर जगभरातील यूजर्स याबाबत नवनवीन प्रयोग करताना आपल्याला दिसत आहे. सध्या एका चाइनीज व्यक्तीने अनोखा प्रयोग केला आहे. त्याच्या या प्रयोगामुळे सगळेच हैरान झाले आहेत. चीनच्या या व्यक्तीने आर्टिफिशियल इंटेलिजंसच्या मदतीने आपल्या मृत झालेल्या आज्जीला जीवंत करण्याच्या प्रयत्न केला आहे. ही गोष्ट ऐकण्यासाठी वेगळी वाटेल, पण ही घटना खरी आहे. यामध्ये त्या व्यक्तीला काही प्रमाणात यश देखील मिळाले आहे.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, अलीकडेच चीनमध्ये वू नावाच्या २४ वर्षीय व्यक्तीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने आपल्या दिवंगत आजीचा वास्तविक जीवनातील डिजिटल अवतार तयार केला आहे. वूच्या या प्रयोगानंतर जगभरातील तज्ज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे या चिनी व्यक्तीने आपल्या प्रयोगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वूच्या मृत आजीच्या AI आवृत्तीमधील संभाषणाचा ऑडिओ आहे.

भाजप प्रवेशावर काय म्हणाले अजितदादा? वाचा 10 मुद्द्यांमध्ये

या व्हिडिओमध्ये वू म्हणतो की, आजी, माझे बाबा आणि मी या वर्षी तुझ्यासोबत चंद्र नववर्ष साजरे करण्यासाठी आमच्या गावी परत येऊ. माझ्या वडिलांनी तुला मागच्या वेळी फोन केला होता. तू त्याला काय म्हणालीस? यावर आभासी आजीने उत्तर दिले की मी त्याला दारू पिऊ नकोस असे सांगितले. तसेच चांगला माणूस हो आणि पत्ते खेळू नको, असेही सांगितले.

Atiq Ahmed : अतिक अहमदच्या संपत्तीचा आकडा वाचाल तर डोळे पांढरे होतील

वू म्हणतात की मी माझ्या आजीच्या आयुष्यातील अनेक तपशील chatgpt वर शेअर केले आहेत, या आशेने की ती माझ्या आजीची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि भाषा समजू शकेल, जेणेकरून ती माझ्या आजीच्या उच्चारात माझ्याशी संवाद साधू शकेल. AI वापरून, वू ने आजीची उपस्थिती, आवाज, व्यक्तिमत्व आणि आठवणी टिपल्या आहेत.

Exit mobile version