Bangladesh Violence : बांग्लादेशात उसळलेल्या हिंसाचाराच्या झळा (Bangladesh Violence) आता भारतालाही बसू लागल्या आहेत. बांग्लादेशाच्या शेजारी असलेल्या भारतीय राज्यांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आता सीमावर्ती मेघालय (Meghalaya) राज्यातून मोठी बातमी समोर आली आहे. बांग्लादेशातील चिघळलेली परिस्थिती पाहता मेघालय राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री प्रेस्टोन तिनसाँग यांनी दिली. दरम्यान, बांग्लादेशातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या (Sheikh Hasina) पक्षाची कार्यालये, पक्षनेत्यांची घरे, हॉटेल्स सरळसरळ पेटवून दिली जात आहेत.
Bangladesh : धक्कादायक! हॉटेलच्या आगीत 8 होरपळले; हिंसक जमावाच्या मदतीने 500 कैदी पळाले
बांग्लादेशातील वाढत्या हिंसाचारामुळे सीमावर्ती भारतीय राज्यांत हाय अलर्ट आहे. याच दरम्यान मेघालय सरकारने नाईट कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) अधिकारी आणि मेघालय पोलीस यांच्यात झालेल्या एका महत्वाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मेघालयाचे उपमुख्यमंत्री प्रेस्टोन तिनसोंग म्हणाले की बांग्लादेशातील सध्याची परिस्थिती पाहता राज्य सरकारने बांग्लादेशला लागून असलेल्या हद्दीत संचारबंदी लागू केली आहे. बांग्लादेशला लागून असलेल्या जवळपास 444 किलोमीटर पेक्षा जास्त क्षेत्रात दररोज संध्याकाळी सहा ते सकाळी सहा या काळात संचारबंदी राहिल.
सीमा सुरक्षा दलाने बांग्लादेशातील परिस्थिती पाहून जवळपास 4 हजार 96 किलोमीटर लांब भारत-बांग्लादेश हद्दीतील सर्व युनिट्ससाठी हाय अलर्ट जारी केला आहे. यानंतर केंद्र सरकारमध्येही घडामोडींनी वेग घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या घरी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विदेश मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बांग्लादेशातील सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बांग्लादेशला झटका! टी 20 वर्ल्डकप होणार शिफ्ट?, ICC ने केली तयारी
बांग्लादेशात हिंसाचाराने रोद्ररूप धारण केलं आहे. (Bangladesh ) अनेकांची घर पेटवून दिली जात आहेत. त्यामध्ये आता समोर आलेल्या बातमीनुसार बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मश्रफी मुर्तझा याच्या घराला आंदोलकांनी आग लावली. देशात सध्या सुरू असलेल्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि सुरक्षा दलांकडून विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन गोळ्या घातल्या जात आहेत. जेसोर जिल्ह्यातील एका हॉटेलला आग लावण्यात आली. यामध्ये आठ लोकांचा होरपळून मृत्यू झाला. तर 84 लोक जखमी झाले आहेत. आग लावण्यात आलेल्या हॉटेलचा मालक अवामी लीगचा नेता शाहीन चकलादार आहे. शेरपूर जिल्ह्यातील एका जेलमध्ये प्रदर्शनकारी घुसले आणि जवळपास पाचशे कैद्यांना जेलमधून पळून जाण्यास त्यांनी मदत केली.