Dirty act in Restaurant: आपण सगळेच कधी ना कधी रेस्टॉरंटमध्ये जेवायला जात असतो. मात्र, आता एका रेस्टॉरंटमधील एक अतिशय धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला. एक वेटर इतकं घाणेरडं कृत्य करायचा की, याबद्दल खुलासा होताच सर्वांनाच धक्का बसला. अमेरिकेतील हेअरफोर्ट हाऊस स्टीकहाऊस रेस्टॉरंटमधील २१ वर्षीय वेटर जेस ख्रिश्चन हॅन्सन (Jace Christian Hanson) हा सॅल्मन फिशवर त्याचा प्रायव्हेट पार्ट घासायचा आणि सॉस तसंच लोणच्यामध्ये लघवीही करायचा असं आढळून आलं.
असदुद्दीन ओवेसी यांचं मोठं वक्तव्य! म्हणाले, हिजाब घालणारी महिला भारताची पंतप्रधान होईल
असे प्रकार सुमारे 20 वेळा केल्याची कबुली जेस ख्रिश्चन हॅन्सन दिली. त्याने सांगितले की, डेटिंग ॲप्स आणि फेटिश वेबसाइट्सवरील त्याचे मित्र त्याला असं करण्यास सांगत होते. वास्तविक, पोलिसांनी एका वेबसाइटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओची थंबनेल पाहिली होती. व्हॅन्डलायझर नावाच्या युजरने हा व्हिडिओ वेबसाइटवर पोस्ट केला होता.
‘तू नागपूरला ये, नाहीतर मी बारामतीत येतो…’; कॉंग्रेस नेत्याचं अजितदादांना चॅलेंज
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांवर आपला प्रायव्हेट पार्ट्स घासताना पोलिसांनी दिसला. याशिवाय व्हिडिओतील व्यक्तीने जेवणात लघवीही केली. त्याने ते अन्न पायांनी तुडवले आणि नंतर ते लोकांना दिल्याचं व्हिडिओत दिसलं. त्यानंतर एफबीआयने आधी हॅन्सनचा फोन नंबर मिळवला आणि नंतर त्याचा माग काढला. तो हेअरफोर्ट हाऊस येथे काम करत असल्याचे कळलं.
त्यानंतर पोलिसांनी रेस्टॉरंटच्या प्रमुखाशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, हे त्यांच्यांच रेस्टॉरंटचे जेवण होतंय यानंतर हॅन्सनला बोलावण्यात आले. त्या दिवशीही तो किचनमध्ये काम करत होता. पोलिसांनी त्याच्या कृत्याविषयी विचारले असता हॅन्सनने आपल्या कृतीची कबुली दिली. हॅन्सन म्हणाला, की लोक त्याला ग्राइंडर आणि स्निफी सारख्या अॅप्सवर हे करण्याची विनंती करतात. यानंतर तो अश्लील कृत्य करत व्हिडिओ बनवून पोस्ट करत असे.
हॅन्सनने पोलिसांना असंही सांगितलं की, तो अनेकदा रेस्टॉरंटमध्ये हस्तमैथुन करायचा पण त्याने खाद्यपदार्थात कधीच स्पर्म टाकले नाहीत. ही नोकरी आवडत नसल्याने असे प्रकार करत असल्याचं हॅन्सनने सांगितलं. मात्र, घाणेरडे काम केल्यानं त्याला हे काम आवडू लागलं. दरम्यान, हॅन्सनला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॅन्सनला 13 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि $100,000 दंड होऊ शकतो.