Download App

डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ ‘वार’ सुरुच; सिनेमा विश्वाला दिला हादरा, वाचा नक्की काय घेतला निर्णय?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक टॅरिफ बॉम्ब टाकला आहे. त्यांनी टॅरिफबाबत नवी घोषणा केली आहे.

  • Written By: Last Updated:

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांपासून भारतावर टॅरिफ बॉम्ब टाकले आहेत. (Tariff) त्यावरून मोठ वादळ सुरू असतानाच ट्रम्प यांनी आणखी एक टॅरिफ बॉम्ब टाकला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर तयार झालेल्या सिनेमांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्याच आठवड्यात ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर बनवल्या जाणाऱ्या औषधांच्या आयातीवर 100 टक्के टॅरिफ लादलं आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्ममध्ये अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानुसार त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. आता ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर बनलेल्या सिनेमांवर 100 टक्के टॅरिफ लावत असल्याचं जाहीर केलं. हे टॅरिफ जाहीर करताना ट्रम्प म्हणाले की जसं लहान मुलाच्या हातातील कँडी चोरुन घेतली जाते, तसंच इतर देशांकडून सिनेमा उद्योग अमेरिकेच्या हातातून चोरुन घेण्यात आला. याचा फटका कॅलिफोर्नियाला त्यांच्या कमजोर आणि अक्षम गव्हर्रनरमुळं बसला आहे.

संयुक्त राष्ट्र संघ महासभेत पाकिस्तानचं ऑपरेशन सिंदूर अन् हिंदूत्वावर बोट, भारताचं सडेतोड उत्तर

या आदेशानुसार दीर्घकाळ आणि कधीच न सुटणाऱ्या प्रश्नासाठी अमेरिकेबाहेर बनलेल्या कोणत्याही सर्व चित्रपटांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद, अमेरिकेला पुन्हा महान बनवुया, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. तसंच, अमेरिकेचं अध्यक्षपद दुसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लावले आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेला पुन्हा महान बनवणार असल्याचं म्हटलंय. यासाठी ते विविध देशांवर दबाव आणून व्यापारी करार करत आहेत.

भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी कराराबाबत चर्चा सुरु आहेत. मात्र, अद्याप व्यापारी करार अंतिम झालेला नाही. तोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादलं आहे. याशिवाय भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं भारतावर 25 टक्के टॅरिफ लादलं आहे. म्हणजे अमेरिकेंन भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी काहीच दिवसांपूर्वी अमेरिकेतील औषध निर्मिती उद्योगाला चालना देण्यासाठी विदेशातून आयात केल्या जाणाऱ्या औषधांवर 100 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय जाहीर केला होता.

follow us