Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पची मोठी घोषणा, इराणसह 12 देशांमधील लोकांना अमेरिकेत बंदी

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आतापर्यंत आपल्या दुसऱ्या कार्यकाळात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहे.

Donald Trump (2)

Donald Trump (2)

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आतापर्यंत आपल्या दुसऱ्या कार्यकाळात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहे ज्याचा थेट परिणाम जगावर दिसून आला आहे. तर आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत तब्बल 12 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी केली आहे. याच बरोबर त्यांनी इतर 7 देशांमधून येणाऱ्या लोकांवरही निर्बंध लादले आहेत.

रॉयरटर्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी म्यानमार (Myanmar) , अफगाणिस्तान, हैती, इराण, लिबिया, सोमलिया, गिनी, कॉंगो, येमेन, चाड, सुदान आणि इरिट्रियावर बंदी घातली आहे. माहितीनुसार, हे निर्बंध 9 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून लागू होणार आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबा, लाओस, टोगो, व्हेनेझुएला, बुरुंडी, सिएरा लिओन अशा 7 देशांवर आंशिक बंदी घातली आहे. या देशांमधून येणाऱ्या लोकांवर विशेष अटी आणि कडक चौकशी केली जाणार आहे.

बंदीचे कारण काय?

या निर्णयावर माहिती देत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेच्या नागरिकांच्या राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी मला हे कठोर पाऊल उचलावे लागले आहे. कट्टरपंथी दहशतवाद्यांना अमेरिकेत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी आम्ही पुन्हा प्रवास बंदी करत आहोत. असं माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

तर व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या अबीगेल जॅक्सन म्हणाल्या की ज्या देशांवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे त्यांनी अमेरिकेची सुरक्षा तपासणी आणि तपासणी प्रक्रिया अयशस्वी केली आहे. काही देशांमध्ये दहशतवादाला राज्य पुरस्कृत पाठिंबा आणि काही देशांमध्ये व्हिसाच्या ओव्हरस्टेचा उच्च दर यामुळे हे निर्बंध लादण्यात आले आहेत.

ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही, कारवाई करु; चंद्रहार पाटलांनी साथ सोडताच राऊतांचा इशारा 

कोणत्या व्हिसावर परिणाम होणार?

ही प्रवास बंदी केवळ स्थलांतरित (कायमस्वरूपी निवास) व्हिसांपुरती मर्यादित नाही, तर त्यात अनेक गैर-स्थलांतरित व्हिसा देखील समाविष्ट आहेत, ज्यात B-1 (व्यवसाय व्हिसा), B-2 (पर्यटक व्हिसा), F (विद्यार्थी व्हिसा), M (व्यावसायिक व्हिसा) आणि J (एक्सचेंज प्रोग्राम व्हिसा) चा समावेश आहे.

Exit mobile version