म्यानमार आणि थायलंडमध्ये मृत्यूचं तांडव; मदतीसाठी धावलं भारताचं ‘ऑपरेशन ब्रह्मा’, पाहा फोटो

- विनाशकारी भूकंपामुळे म्यानमार थायलंड या राष्ट्रांमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे.
- या भूकंपामध्ये म्यानमारमध्ये 1 हजार 644 लोकांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. परंतु कोसळलेल्या इमारतींचा विध्वंस पाहता हा आकडा दहा हजारापर्यंत जाऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे.
- काही महिन्यांपूर्वी म्यानमार आणि भारतामध्ये तणाव निर्माण झाला होता. परंतु संकटाच्या काळात भारत म्यानमारसाठी धावून आला आहे. म्यानमारमधील बचाव कार्यासाठी भारत ऑपरेशन ब्रह्मा राबवत आहे.
- या ऑपरेशनमध्ये 15 टन साहित्य, एनडीआरएफची 80 जणांची एक टीम आणि फील्ड हॉस्टिपल मदतीसाठी पाठविले आहे. फील्ड हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व नर्सेस असे 118 जण असणार आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत हा म्यानमारचा मित्र आहे. त्यामुळे कठिण परिस्थिती आम्ही या देशाबरोबर आहोत. त्यांना आवश्यक सर्व मदत केली जाईल.