Download App

मेक्सिको अन् कॅनडाला दिलासा.. टॅरिफचा निर्णय थांबला; ट्रम्प यांनी घेतली माघार

मेक्सिको आणि कॅनडा यांच्याबाबतच्या निर्णयावर एक महिन्यासाठी स्थगिती देण्यात आली आहे. चीनला मात्र कोणतीही सूट मिळालेली नाही.

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. परंतु, आता त्यांना या निर्णयावरून माघारही घ्यावी लागत आहे. टॅरिफ निर्णयाबाबत ट्रम्पना दोन पावलं मागे घ्यावी लागली आहेत. चीन, मेक्सिको आणि कॅनडातून येणाऱ्या उत्पादनांवर टॅरिफ आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, यातील मेक्सिको आणि कॅनडा यांच्याबाबतच्या निर्णयावर एक महिन्यासाठी स्थगिती देण्यात आली आहे. चीनला मात्र कोणतीही सूट मिळालेली नाही.

कॅनडा आणि मेक्सिकोने ड्रग्ज तस्कर आणि सीमा सुरक्षेसाठी मोठे निर्णय घेतले आहेत. यामुळे ट्रम्प यांची काळजी कमी होणार आहे. कारण या देशांच्या सीमा अमेरिकेला लागून आहेत आणि या मार्गांवरुन अमेरिकेत घुसखोरीही होते. परंतु, या दोन्ही देशांनी याबाबत कठोर निर्णय घेतले आहेत. त्यामुळे ट्रम्प सरकारने या देशांविरुद्ध टॅरिफ लादण्याचा निर्णय एक महिन्यासाठी पुढे ढकलला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना झटका! वादग्रस्त नागरिकता आदेशावर न्यायालयाकडून स्थगिती

ट्रम्प सरकारचा हा निर्णय कॅनडा आणि मेक्सिकोसाठी दिलासादायक ठरणार आहे. यामुळे जगभरात वाढत असलेला व्यापार, महागा आणि विकासाच्याबाबतील तणाव कमी होऊ शकतो. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच या निर्णयाची माहिती सोशल मिडियावर दिली. शनिवारी घेतलेला टॅरिफचा निर्णय तीस दिवसांसाठी रोखण्यात आला आहे. कॅनडाबरोबर होणारा करार पूर्णत्वास येईल या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे.

यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी देखील त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून एक ट्विट केले आहे. कॅनडा सरकारकडूनही यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. अमेरिकेसोबत एक टास्क फोर्स स्थापित केला जाईल. या माध्यमातून मनी लाँड्रिंग, फेंटानिल तस्करी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी कार्यवारी करण्यात येईल. या व्यतिरिक्त मॅक्सिकन कार्टेल्सला दहशतवादी संघटना घोषित करण्याच्या निर्णयाचीही प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल.

ट्रम्प यांचा टॅरिफ निर्णय काय होता

डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी मोठी घोषणा केली होती. मॅक्सिको आणि कॅनडातून येणाऱ्या विविध प्रकारच्या उत्पादनांवर 25 टक्के टॅरिफ आकारण्यात येईल असे सांगितले होते. चीनमधून येणाऱ्या उत्पादनांवर दहा टक्के टॅरिफ आकारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. तसेच कॅनडामधून येणाऱ्या ऊर्जा संसाधनांवर अमेरिका सरकार दहा टक्के टॅरिफ आकारण्याचा विचार करत होते. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर अमेरिका आणि कॅनडा-मेक्सिकोत सुरू होणारे टॅरिफ वॉर तुर्तास थांबले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागताला ढोल ताशा; पुणेरी शिवम ढोल पथकाचा आवाज घुमणार 

follow us