Donald Trump Guilty : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना (Donald Trump) जोरदार झटका बसला आहे. अमेरिकेच्या इतिहासात विद्यमान किंवा माजी राष्ट्राध्यक्षांविरुद्ध फौजदारी खटला सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना हनी मनी प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. या खटल्यावर सलग दोन दिवस सुनावणी घेण्यात आली. हश मनी ट्रायल प्रकरणातील सर्व 34 प्रकरणांत त्यांना दोषी ठरवण्यात आले. सीएनएननुसार मॅनहॅटन ज्युरींनी डोनाल्ड ट्रम्प यांना व्यावसायिक कागदपत्रांच्या हेराफेरी केल्याप्रकरणी सर्व 34 आरोपांत दोषी ठरवले.
Donald Trump : ठरलं तर! राष्ट्राध्यक्षपदासाठी पुन्हा ट्रम्प-बायडेन टक्कर; ‘या’ उमेदवाराची माघार
या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यानंतर शिक्षेवर 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. न्यायाधीश जुआन मर्चन यांनी सुनावणीसाठी ही तारीख निश्चित केली आहे. आता त्यांना काय शिक्षा मिळेल हे सर्व न्यायाधीशांवर अवलंबून असेल. यामध्ये प्रिजन टाइम (जेल) किंवा प्रोबेशन शिक्षेचा समावेशअ असू शकतो. या प्रकरणातील पुढील सुनावणीत न्यायालयाकडून ट्रम्पना शिक्षा सुनावली जाऊ शकते. याच वर्षातील नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका होत आहेत. त्याआधी न्यायालयाचा हा निर्णय ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
अमेरिकेच्या इतिहासात ही बहुधा पहिलीच घटना असेल ज्यात एका माजी राष्ट्राध्यक्षाला एखाद्या आरोपात दोषी धरण्यात आले. या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत हा निर्णय अपमानजनक असल्याचे म्हटले आहे. खरा निकाल तर 5 नोव्हेंबर 2024 ला राष्ट्रपती निवडणुकी दरम्यान येणार आहे असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. यानंतर विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही आपल्या प्रतिस्पर्ध्याला मतपेटीतूनच पराभूत केले जाऊ शकते असा दावा केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सन 2006 मध्ये स्टॉर्मी डॅनियल्ससोबत शारीरिक संबंध ठेवले होते असा आरोप त्यांच्यावर आरोप होते. या प्रकरणाची बरीच चर्चाही झाली होती. या गोष्टी सार्वजनिक करण्याची धमकी स्टॉर्मीकडून दिली जात होती. त्यामुळे ट्रम्प तिला गुपचूप पैसे देत होते. ट्रम्प यांनी तिला दिलेले तेरा हजार डॉलर्सचे पेमेंट लपवण्यासाठी त्यांच्या व्यावसायिक कागदपत्रात फेरफार केले असा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात आता त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
‘सत्तेत आल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरीतांना बाहेर काढणार’; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा