Download App

ब्रेकिंग : भारताच्या हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त, संध्याकाळी होणार होता सामना

 Rawalpindi Cricket Stadium : पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम जवळ ड्रोनचा हल्ला झाला आहे.

 Rawalpindi Cricket Stadium : पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम ( Rawalpindi Cricket Stadium) जवळ ड्रोनचा हल्ला झाला आहे. या स्टेडियममध्ये आज रात्री 8 वाजता पाकिस्तान सुपर लीगचा (PSL) सामना होणार होता. या मैदानात पेशावर झल्मी आणि कराची किंग्ज यांच्यात आज रात्री 8 वाजता सामना होणार होता मात्र या हल्ल्यानंतर सामना रद्द करण्यात आला आहे.

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एक भारतीय ड्रोन रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम जवळ असणाऱ्या  झाडावर आदळला ज्यामुळे दुकानाच्या खिडक्यांचे नुकसान झाले. या घटनेत एक नागरिक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी यापूर्वी दावा केला होता की लाहोर, गुजरांवाला, चकवाल, बहावलपूर, मियानो, कराची आणि रावळपिंडी येथे काही ड्रोन निष्क्रिय करण्यात आले आहेत.

मोठी बातमी, पाकिस्तानी एअर डिफेन्स उद्ध्वस्त, भारताचा थेट लाहोरवर ड्रोन हल्ला

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला होता. तर पाकिस्तानकडून ऑपरेशन सिंदूरनंतर  7 आणि 8 मे 2025 च्या रात्री अवंतिपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फाळोदी, उत्तरलाई आणि भुज यांसारख्या उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र या सर्व हल्ल्यांना भारताच्या इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टमने यशस्वीरित्या निष्प्रभ केले.  यानंतर भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत  लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स आणि रडार यंत्रणा (Pakistan Air Defence Systems) उद्ध्वस्त केली असल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे.

follow us