पाकिस्तान टी-20 लीग खेळण्यासाठी इंग्लंडचा स्टार खेळाडू थेट बोर्डलाच भिडला, देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास दिला नकार
James Vince : आगामी पाकिस्तान सुपर लीग 2025 खेळण्यासाठी इंग्लंडचा (England) स्टार फलंदाज जेम्स विन्सने (James Vince) देशांतर्गत क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. पीएसएलमध्ये (PSL) जेम्स विन्स कराची किंग्जकडून (Karachi Kings) खेळणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) पीएसएलमध्ये सहभागी होण्यासाठी इंग्लिश क्रिकेटपटूंना एनओसी न दिल्यानंतर जेम्स विन्सने हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे.
नोव्हेंबर 2024 मध्ये इंग्लंड बोर्डाने पीएसएलमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व फॉरमॅटमधील खेळाडूंना एनओसी न देण्याचा निर्णय घेतला होता. एप्रिल – मे दरम्यान इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशिप (County Championship) होत असल्याने इंग्लंड बोर्डाने हा निर्णय घेतला होता. इंग्लंडसाठी 13 कसोटी सामने खेळणारा स्टार फलंदाज या हंगामात हॅम्पशायरचे नेतृत्व करणार असल्याची चर्चा होती मात्र त्यापूर्वी त्याला कराची किंग्जने आपल्या संघात कायम ठेवले.
याबाबत माहिती देत एका निवेदनात जेम्स विन्सने म्हटले आहे की, मला हॅम्पशायर खूप आवडते. हॅम्पशायर 16 वर्षांपासून माझे क्लब आणि घर आहे, त्यामुळे मला टी-20 क्रिकेटमध्ये हॅम्पशायरसाठी सर्वोत्तम कामगिरी करत राहायचे आहे आणि द ब्लास्टमधील आमच्या यशावर भर द्यायचा आहे. असं त्याने या निवेदनात म्हटले आहे.
मोठी बातमी, संतोष देखमुख अन् सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात होणार न्यायालयीन चौकशी
2015 पासून हॅम्पशायरसाठी खेळणारा जेम्स विन्स सध्या ILT20 स्पर्धेत गल्फ जायंट्सकडून खेळत आहे. दरम्यान, हॅम्पशायरचे क्रिकेट संचालक जाइल्स व्हाईट यांनी विन्सच्या निर्णयाबद्दल आदर व्यक्त केला. विन्सने 216 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 40 च्या सरासरीने 13,340 धावा केल्या आहेत, ज्यात 30 शतकांचा समावेश आहे.