Download App

Earthquake in Italy : इटलीत हादरली; 4.8 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का…

Earthquake in Italy : इटलीमध्ये आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इटलीमधील टस्कनीच्या काही भागांमध्ये 4.8 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान, या भूकंपाच्या धक्क्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अचानक घडलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये एकच भीती निर्माण झाली आहे.

विशेष अधिवेशनाचा राज्यघटनेत उल्लेखच नाही; मग आतापर्यंत 8 वेळा कसे झाले विशेष अधिवेशन

इटलीच्या इन्स्टिट्यूट ऑफ जिओफिजिक्स अँड व्होल्कॅनोलॉजीच्या माहितीनूसार इटलीमधील टस्कनीमध्ये घडलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू फ्लोरेन्स शहराच्या ईशान्येकडीला मराडीजवळ असल्याचं समोर आलं आहे. टस्कनीमध्ये हा भूकंप आज पहाटे 5 वाजून 10 मिनिटाने घडला असून या भूकंपाची तीव्रता इतकी भयानक होती की आजूबाजूच्या शहरांनासुद्धा सौम्य धक्के जाणवले आहेत.

संसदेचं विशेष अधिवेशन आजपासून, कोणत्या मुद्दांवर होणार चर्चा? महिला आरक्षणसाठी विरोधी पक्ष आग्रही

भूकंपाच्या धक्क्यानंतर टस्कनीसह आजूबाजूच्या परिसरांतील नागरिकांनी अग्निशमन दलाकडे संपर्क साधला असून ज्या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्या ठिकाणी अद्याप तरी कोणती माहिती समोर आली नसून भूकंपाच्या धक्क्यामुळे इथले नागरिक भयभीत झाले आहेत.

दरम्यान, इटलीमध्ये 1919 साली मुगेलो भागात सर्वात शक्तिशाली भूकंप घडला होता. इटलीमध्ये आज ज्या भागांत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, त्या भागांत भूकंपाचा धोका असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

Tags

follow us